berojgar.jpg 
विदर्भ

लॉकडाउनमुळे "लॉक' झाले भरतीपूर्व उमेदवारांचे भवितव्य

अतित डोंगरे

मुंडीकोटा (गोंदिया) :  स्पर्धेच्या या कालावधीत पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागले. मात्र, कोरोनारूपी संकटाने किंबहुना लॉकडाउनने त्यांचे भवितव्य लॉक केले आहे. त्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर आहे.


सध्या स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे नोकरीसाठी कठीण परिश्रम हे महत्त्वाचे मानले जाते. त्यादृष्टीने हजारो तरुण, तरुणी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. काहींनी तयारी पूर्णही केली आहे. अनेक विभागाच्या जाहिराती पाहून अर्जही केले आहेत. मात्र, याच दरम्यान कोरोनाने आपले पाय पसरल्याने सुशिक्षित बेरोजगारांच्या इच्छा-आकांक्षांवर पाणी फेरले आहे.

कोरोनाने देश आणि राज्यांच्या तिजोरीवरही परिणाम झाला आहे. हाच परिणाम रोजगार भरतीवर होणार असल्याने आगामी परीक्षा कधी होणार याचे कोणतेही सोयरसुतक नाही. परिणामी, बेरोजगारांची फौज निर्माण होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. रोजगाराची समस्या गावात जाणवणार आहे. देश, विदेश, राज्याच्या विविध भागांत कामानिमित्त गेलेल्या नागरिकांची पावले गावात परत आल्याने कुटुंब चालवायचा कसा, असा प्रश्‍न भेडसावत आहे.


 मेहनत करून नोकरीवर लागणाऱ्या युवकांचे पुरते मनोबल खचले आहे. शासनाने भरतीप्रक्रिया त्वरित राबवावी.
 कमलेश झेलकर


शासनाने बेरोजगारांना बेकारी भत्ता द्यावा किंवा लवकरात लवकर परीक्षेचे नियोजन करावे.
 प्रवीण खेडीकर, अध्यक्ष, सामाजिक संस्था. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasla Dam Water Level : पुणेकरांची चिंता वाढली! खडकवासला धरणसाखळीत मागील वर्षाच्या तुलनेत 5.27 टीएमसी पाणी कमी, चारही धरणांत 23.05 टीएमसी साठा शिल्लक

Gokul Government Directors : अखेर 'त्या' अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी; गोकुळवर पाच शासकीय संचालक नियुक्तीचा मार्ग मोकळा, मतदानाचाही मिळाला अधिकार

IND vs NZ 2nd ODI Live : वेलिंग्टन वन डे सामन्याला विलंब का होतोय? मॅच सुरू व्हायची वेळ झाली, पण अजून टॉसही झालेला नाही; जाणून घ्या अपडेट्स

Gokul Chairman Election Controversy : 'जय-पराजय होतात, पण माझ्या मुलाबद्दल जे केलं त्याबद्दल फार खंत वाटते, ते जिव्हारी लागलंय'; हसन मुश्रीफांनी व्यक्त केलं दु:ख

Daily Horoscope : राशिभविष्य - शनिवारी ७ नोव्हेंबर २०२६

SCROLL FOR NEXT