file photo 
विदर्भ

लॉकडाउनमुळे टेलरिंग व्यावसायिकांना बसला फटका; कारागिरांवर उपासमारीची वेळ

सकाळ वृत्तसेवा

नवेगावबांध (जि. गोंदिया) : नवेगावबांध येथे पंधरा ते पंचवीसच्या घरात व तेवढीच लेडीज टेलरिंग दुकाने आहेत. येथील टेलरिंग दुकान बंद असल्यामुळे कापडावर चालणारी कैचीची कचकचही थांबली आहे. त्यामुळे शिलाई मशीनचा घरघर येणारा आवाज आता ऐकू येत नाही. त्या दुकानात काम करणारे स्थानिक व बाहेरगावाहून येणारे शेकडो कारागीर आहेत.

हे कारागीर गेल्या महिन्याभरापासून घरी बसले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारी बरोबरच उपासमारीची पाळी आली आहे. हे सर्व कारागीर असंघटित असल्यामुळे त्यांचा आवाज शासनदरबारापर्यंत पोहोचू शकत नाही.

कारागीर तीनशे ते चारशे रुपये कमावतात

अर्जंट कपडे शिवण्याचा ट्रेन्ड असलेले टेलरिंग दुकान मालक चार-पाच कारागीर ठेवतात. एका ड्रेसचे 400 ते 500 रुपये येथील टेलरिंग दुकानदार घेतात. त्याच्याकडील कारागीरही दिवसाला पाच शर्ट व पाच पॅन्ट कमीत कमी शिवतात. हे कारागीर दिवसाकाठी तीनशे ते चारशे रुपये कमावतात. उन्हाळ्यात व दिवाळीत यांचा सीझन असतो. जानेवारी महिन्यापासून लग्नसराई सुरू होते. त्यामुळे या व्यवसायाला अच्छे दिन येतात. परंतु संचारबंदीमुळे लग्न व इतर समारंभावर बंदी आल्यामुळे याचा फटका या व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर बसला आहे.

कपडे न्यायला ग्राहक फिरकत नाही

या सिझनात दुकान मालक व कारागीरही मुबलक पैसे कमावतात. परंतु कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सुरू झालेला लॉकडाउन व संचारबंदी त्यांच्या व्यवसायावर संक्रात आणणारा ठरला आहे. हा व्यवसाय पूर्णतः ठप्प झाला आहे. लॉकडाउनपूर्वी शेकडो ड्रेस यांच्याकडे शिवून तयार आहेत. परंतु संचारबंदी लागल्यामुळे शिवून तयार असलेले कपडे न्यायला ग्राहक फिरकत नाही. त्यामुळे ड्रेस शिवण्यासाठी लागणाऱ्या मटेरियलमध्ये दुकान मालकांचे पैसे फसलेले आहेत.

कोरोनामुळे व्यवसाय ठप्प

बाजाराच्या दिवशी हप्तेवारी पैसे घेऊन गुजराण करणाऱ्या कारागिरांचे फार हाल झाले आहेत. हा व्यवसाय लघुउद्योग असल्यामुळे इच्छा असूनही दुकान मालकाला आपल्या कारागिरांना मदत करता येत नाही, याचे दुःखही टेलरिंग दुकान व्यवसायिक आनंद बडोले यांनी व्यक्त केले आहे. कोरोनामुळे हे व्यवसाय ठप्प झाल्यामुळे दुकान मालकाबरोबरच या दुकानावर गुजराण करणारे कारागीरही हतबल झाले आहेत.


आमच्या व्यवसायाची लवकर सुटका करा
रोज 300 ते 400 रुपये कमावत होतो. त्यावरच आपला संसार सुरू होता. परंतु लॉकडाउनमुळे दुकान बंद आहे. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. लॉकडाउनमधून आमच्या व्यवसायाची लवकर सुटका व्हावी व आमची रोजीरोटी पूर्वीसारखीच सुरू होणे गरजेचे आहे. जवळचे होते नव्हते ते सर्व संपले.
- शेखर डोंगरे, टेलरिंग कारागीर, नवेगावबांध.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

८० लाख पॅकेजची नोकरी AIमुळे गेली, IT इंजिनिअर पतीने आयुष्य संपवलं; शेवटची चिठ्ठी वाचून पत्नीनेही १८व्या मजल्यावरून मारली उडी

Kurla Accident: कुर्ला बस दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट, आरोपी बेस्ट बसचालकला अखेर जामीन; हायकोर्टाचा निर्णय

Team India Schedule: भारतीय संघ व्यस्तच राहणार...! इंग्लंड दौऱ्यानंतर या देशात टी२० मालिका खेळणार; BCCI कडून घोषणा

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला ९ कोटींचा फटका... राजस्थान रॉयल्सच्या 'Deal' शी आहे कनेक्शन; जाणून घ्या सर्व प्रकरण

"दारूमुळे माझं पहिलं लग्न मोडलं" जावेद अख्तरांची कबुली ; "मी एका वेळेला 18 बियर.."

SCROLL FOR NEXT