lockdown rules broken in amravati 
विदर्भ

लॉकडाऊनची पर्वा न करता अमरावतीच्या या भागात सुरू होते कपडे शिवण्याचे काम

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : संचारबंदी काळात खत्री कंपाउंड परिसरात अनेक रेडीमेट कपडे शिवण्यासाठी परप्रांतीय मजूरांकडून काम करून घेतल्या जाते. त्यामुळे सलग दुसऱ्याही दिवशी शहर कोतवाली ठाण्यात उद्योग सुरू ठेवल्याबद्दल पुन्हा दोन व्यापाऱ्यांविरुद्ध बुधवारी (ता. आठ) गुन्हे दाखल झाले.

सुनील देवराव पमनानी (वय 45) व सुरेश पद्मानंद आहुजा (वय 40) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्या मालकीच्या खत्री कंपाउंड परिसरात सागर टेक्‍सटाइल्स नावाने कपडे तयार करण्याचा उद्योग आहे.

संचारबंदीत सलग दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा

त्याठिकाणी बुधवारी (ता. 8) या उद्योग समूहाची पोलिसांनी तपासणी केली असता, तीन परप्रांतीय लोक येथे कार्यरत असल्याचे दिसले. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना, त्याचे उल्लंघन केल्याचा ठपका या दोघांवर ठेवण्यात आला. त्यापूर्वी मंगळवारी (ता. सात) बंटी भोजवानी आणि धीरज चांदवानी यांच्याही उद्योगाच्या ठिकाणाहून पस्तीस ते चाळीस मजूर काम करताना आढळल्याने त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT