bajar samiti.jpg 
विदर्भ

लॉकडाउन’मध्ये चालतो असाही गोरखधंदा; मात्र, यात बळीराजाचा जातोय जीव

राम चौधरी

वाशीम : कोरोनाच्या प्रकोपाने सर्व व्यापार उदीम ठप्प झाला आहे. मात्र, जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी मात्र अहोरात्र कामात आहे. याच शेतकऱ्यांना ‘लॉकडाउन’चा फायदा घेत खासगी बाजार समित्यांमध्ये नाडले जात असल्याचे चित्र समोर येत आहे. वाशीम येथील एका व्यापाऱ्याला खासगी बाजार समिती सुरू करण्याचा परवाना पणन संचालकांकडून मिळाला नसताना, चक्क बाजार समितीतील माल आपल्या खासगी बाजार समितीतून आणून मातीमोल दराने खरेदी करण्याचा सपाटा या व्यापाऱ्याने लावला आहे. जिल्हाधिकारी यांनी या गंभीर बाबीची चौकशी करण्याची गरज आहे.

‘लॉकडाउन’च्या काळामध्ये सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. मात्र, हाता-तोंडाची गाठ घालताना लागणारे अन्न शेतकरी पिकवीत आहेत. मात्र, याच शेतकऱ्यांना बाजार समिती अंशतः सुरू असल्याचा फायदा घेत, नाडण्याचे उद्योग वाशीम शहरात सुरू आहेत. येथील हिंगोली रोडवर तीन खासगी बाजार समित्या उभ्या राहिल्या आहेत. यामध्ये दोन बाजार समित्यांना पणन विभागाची परवानगी आहे. मात्र, तिसऱ्या बाजार समितीचा परवानगी अर्ज पणन विभागाकडे प्रलंबीत असताना, या व्यापाऱ्याने मात्र मातीमोल दराने शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. रस्त्यावर दोन इसमांना ठेऊन रस्त्याने जाणारा शेतमाल अडवून शेतमाल खासगी बाजार समितीत आणण्यास शेतकऱ्यांना बाध्य केले जाते.

त्यानंतर शेतकऱ्यांचा माल ओट्यावर टाकल्यानंतर मनमानेल त्या पद्धतीने खरेदी केल्या जातो. त्यावेळी शेतकऱ्यांचाही नाईलाज असल्याने शेतकऱ्यांना तो माल कमी किंमतीमध्ये या व्यापाऱ्याला विकल्याशिवाय पर्याय राहत नाही. ‘लॉकडाउन’च्या काळात जो शेतकरी जनतेचे पोट भरण्याचे काम करीत आहे. त्याच्या पोटावर नियमबाह्य रितीने पाय देण्याचे पाप होत असेल तर, ही बाब अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाचा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी तपास करण्याची गरज आहे.

बाजार समितीलाही लाखोंचा चुना
महाराष्ट्र सहकार कायद्यानुसार बाजार समिती व्यतिरिक्त कोठे शेतमालाची खरेदी-विक्री होत असेल तर, त्याचा सेस बाजार समितीला द्यावा लागतो. मात्र, येथे चक्क बाजार समितीतील आपल्या आडतेतील माल भरून खासगी बाजार समितीत नेला जातो. यामध्ये बाजार समितीचाही सेस बुडतो. वरून शेतकऱ्यांचेही अतोनात नुकसान होते. हा नियमबाह्य प्रकार थांबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

...तर याची सखोल चौकशी
वाशीम शहरातील विठ्ठल बाजार समिती व बालाजी बाजार समिती या दोन बाजार समित्यांना पणन विभागाची परवानगी आहे. तिसऱ्या बाजार समितीचा अर्ज प्रलंबीत आहे. त्या बाजार समितीला अजून परवानगी मिळाली नाही. मात्र, या ठिकाणी जर शेतमालाची खरेदी-विक्री होत असेल तर, याची सखोल चौकशी केली जाईल.
-आर. एल. गडेकर, जिल्हा उपनिबंधक वाशीम

जिल्हाधिकारी यांचा आदेश धाब्यावर
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी सोमवारी (ता.20) एका परिपत्रकाद्वारे शेतमालाची खरेदी-विक्री फक्त शासनाने अधिसूचित केलेल्या कृषी बाजारातच करावी, असे आदेशीत केले होते. मात्र, तरीही हिंगोली रोडवरील या खासगी बाजार समितीत खुलेआम शेतकऱ्यांची लूट होऊन, जिल्हाधिकारी यांचे आदेश पायदळी तुडवले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: होर्मुजच्या समुद्रधुनीत भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाने दिलं उत्तर

Pune News: सुरक्षारक्षकाच्‍या सतर्कतेमुळे युवती सुखरूप परतली घरी; युवती रात्रभर अंधारात, अन् खडकवासला धरण परिसरात काय घडलं!

Pune Pollution: प्रदूषण रोखण्याची घोषणा हवेतच! पुणे महापालिकेला बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर बसविण्याचा विसर, धूलिकणांचा आरोग्यावर गंभीर परिणाम..

Javali politics: जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजेच'धुरंधर'; दोन्ही पदांवर भाजपचाच झेंडा, राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे तटस्थ!

Latest Marathi Update: DRDO घनसावंगी तहसील कार्यालयाच्या पथकांची कारवाई

SCROLL FOR NEXT