Money
Money 
विदर्भ

Loksabha 2019 : निवडणुकीत झालं रे बॉ गुलाबी नोटीचं दर्शन!

विवेक मेतकर

नोटाबंदीनंतर जवळपास बेपत्ता झालेल्या दोन हजाराच्या नोटा पुन्हा झळकल्या 

अकोला - ‘निवडणुकीत झालं रे बॉ गुलाबी नोटीचं फेर दर्शन... नोटाबंदीनंतर ती मोठी चर्चेत आली होती अन् पाहता पाहता गायबही झाली होती भाऊ. नंबर एकची नंबर दोन कधी झाली काही समजलंच नाही... पण निवडणुकीनं तिचं पुन्हा दर्शन घडोलं...’ असे डायलॉग सध्या अवतीभवती ऐकायला येत आहेत. या दशकातली सर्वांत मोठी परिणामकारक घटना ठरलेल्या नोटाबंदीच्यावेळी सर्वाधिक चर्चा झाली ती दोन हजाराच्या नोटीची... त्यावेळी तिचा तं जलवाच होता. कोणी म्हणे त्यात चिप आहे... कोणी म्हणे तिचा रंग जाते.... कोणी म्हणे काळ्या पैशावर उतारा हाय... जमिनीत खाली कितीही खोल दडवून ठेवली तरी ती सॅटेलाईटले सिग्नल पाठोते... काय काय कथा नाही ऐकल्या पण मध्यंतरी ती सर्वसामान्यांवर चांगलीच रुसली होती. अख्ख्या मार्केटमधून ती जणू गायबच झाली होती. पाचशेच्या नोटाईचं दर्शन होये पण दोन हजाराची काही दिसत नव्हती. दोन चार वेळा मन की बातं झाली. त्याप्रत्येकवेळी वाटे का आता दोन हजारचीही बंद करते का... पण तसं झालं नाही. अन् पुन्हा ती दिसली.

आता कशी दिसली म्हणून तिची चर्चा सुरू झाली. कोणी म्हणे काळा पैसा बाहेर निघाला तर कोणी काही आपल्याला तं बॉ तिच्या गुलाबी दर्शनानेच आनंद झाला. आता ती पुन्हा गायब होत आहे... आता ती पुन्हा तिजोरीत जाऊन बसते की काय....गायब झाली म्हणजे काळा पैशानं तिजोऱ्या भरल्या जात असल्याचं समजावं, असे काही ‘जाणकार’ म्हणून रायले रे बॉ... खरं खोटं तोच जाणे..!`

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT