Earphone-62-1024x569.jpg
Earphone-62-1024x569.jpg 
विदर्भ

सुटता जिभेवरील नियंत्रण, मिळे आजाराला आमंत्रण

भगवान वानखेडे

अकोला ः आता काय लॉकडाउनच आहे. घरातच आहोत तर मग रोजच चमचमीत पदार्थ बनवून खाऊया, मिळेल तेव्हा ढाराढूर झोपूया. या आणि अशाच युक्त्या सध्या प्रत्येक घरात सुरू असतील. मात्र, नागरिकांनो, सावधान कारण, याच लॉकडाउनच्या काळात तुमची स्वतःप्रतिची काळजी आणखीन वाढली आहे. लॉकडाउन म्हणजे काही खाणे, पिणे आणि ढाराढूर झोपण्यासाठी नाही. आणि तुम्ही जर असाच विचार करीत असाल तर तुम्हाला पोटाच्या गंभीर आजाराना सामोरे जावे लागणार ऐवढे मात्र खरे. तेव्हा जिभेवर नियंत्रण ठेवल्यास आजाराला आमंत्रण मिळणार नाही.

२२ मार्च ते ३० एप्रिलपर्यंत लागू करम्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये प्रत्येक नागरिक अडकलेला आहे. घरातच रहावे लागत असल्याने प्रत्येकाची दिनचर्येत बदल झाला आहे. तर आता प्रत्येकाच्याच घरी रोज नवी फर्माईश आणि त्याला फर्माईशीला ‘ओ’ देत गृहिणी कुटुंबीयांना मागेल ते पदार्थ बनवून देत आहेत. मात्र, हे रोजच नवनविन चमचमित पदार्थ तुमच्या पोटाच्या गंभीर आजाराकडे घेऊन जात आहेत. तेव्हा जिभेवर नियंत्रण ठेवा आणि आजाराल पळवा असा सल्ला पंचन संस्थेचे तज्ज्ञ देत आहेत.

लॉकडाउनमध्ये हा घ्या आहार
तुम्हाला तुमच्या पोटाचे आरोग्य टिकवून ठेवायचे आहे. तर तुमच्या रोजच्या जेवणात ताज्या पालेभाज्या, तंतूमय पदार्थ म्हणजे, काकडी, गाजर, सर्वप्रकारची तृणधान्ये, कोंड्या सकट धान्ये, ब्रान, पूर्ण गव्हाचा ब्रेड, मिश्र धान्याचा ब्रेड, मूग, मटकी, हरभरा, मटार, चवळी. फळांमध्ये सालासकट सफरचंद, बोर, जांभुळ, सुके अंजीर, संत्री, स्ट्रॉबेरी, आणि पेअर. भाज्यांमध्ये बीट, ब्राकोली, कोबी, गाजर, हिरवे वाटाणे, पालक, सालासकट बटाटे, हिरवे टोमॅटो, मोहरीचा पाला ही सर्व तंतूमय पदार्थ असून, याचा जेवणात समावेश असल्यास आतड्याचा कॅन्सर होत नाही. तेलकट पदार्थ खाणे टाळावेच.

लॉकडाउन इज नॉट स्टॉपडाउन
लॉकडाउन म्हणजे अगदी निष्क्रीय होणे नाही. तेव्हा तुम्ही आधी जे करीत होता ते दिवसांतून अधून-मधून करीत चला. तुम्ही नुसते निष्क्रीय जीवन जगत गेला तर लॉकडाउन उघडल्यानंतर तुम्ही काम करायचेच विसराल. सोबतच ज्या प्रकारे संतूलीत आहार घेत आहात त्याप्रकारेच सकाळी-सायंकाळी व्यायाम केला पाहीजे, घरात किंवा गच्चीवर फेऱ्या, शतपावली करणे गरजेचे आहे असा सल्ला येथील पंचन संस्थेचे सर्जन आणि दुर्बिन परीक्षक डॉ. सुभाषचंद्र कोरपे देतात.

येऊ शकतो ऱ्हदयविकाराचा झटका!
असंतुलित आहार घेणे, नुसते ढाराढूर झोपणे यामुळे रक्तातील कोलॅस्ट्रॉल, साखर वाढते, निष्क्रिय जीवन पद्धतीमुळे रक्तदाब वाढतो, सतत घरात कोंडून राहल्यामुळे चिंतेत भर पडते याचा एकत्रित परिणाम म्हणजे ऱ्हदयविकाराचा झटका येऊ शकतो. तेव्हा नागरिकांनी निष्क्रिय जीवनपद्धतीचा अवलंब न करता कामात गुंतवून घेणे हिताचे राहिल असाही सल्ला डॉ. सुभाषचंद्र कोरपे देतात.

मुलांनाही हलके अन्न द्यावे
नागरिकांनी या लॉकडाउनकडे स्टॉपडाउनच्या दृष्टीने पाहू नये. या दरम्यान संतुलित आहार ठेवून व्यायाम करावा, लहान-मोठ्या पोटाच्या आजारासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. लहान मुलांनाही हलके अन्न द्यावे.
-डॉ.सुभाषचंद्र कोरपे, पंचन संस्थेचे सर्जन आणि दुर्बिन परीक्षक, अकोला. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Loksabha election 2024 : जळगावमध्ये स्ट्राँग रुमचे CCTV काही वेळासाठी बंद; जिल्हाधिकारी म्हणतात...

Gautam Gambhir : केकेआरमध्ये थांबण्यासाठी शाहरूखने गंभीरसमोर ठेवला होता ब्लँक चेक

Swati Maliwal: "बलात्कार, जीवे मारण्याची...", स्वाती मालीवाल यांचा ध्रुव राठी अन् आपवरती मोठा आरोप

Farah Khan : सगळ्यांना ओरडणारी फराह 'या' व्यक्तीला घाबरते; फराहने स्वतःच केला खुलासा

Paneer Kheer : पनीरची भाजी खाऊन कंटाळलात, तर आज संकष्टी स्पेशल पनीरची खीर बनवा

SCROLL FOR NEXT