The lover was hiding in the house of the beloved for a month 
विदर्भ

प्रेयसीच्या घरातच प्रियकर होता महिनाभर लपून, काय असावे कारण? 

भगवान पवनकर

मोहाडी (जि. भंडारा) : प्रेम आणि विरहाने व्याकूळ झालेले प्रेमवीर कुठल्या अग्निदिव्याला सामोरे जातील याचा नेम नाही. प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असणाऱ्या प्रियकराच्या धाडसातून अनेक गमतीदार गोष्टीही घडतात. अशीच एक घटना मोहाडीत घडली. त्याचे झाले असे की, कोरोनामुळे 
लॉकडाउन झाल्याने आपल्या प्रेयसीच्या भेटीसाठी आतुरलेला पुणे येथील तरुण मिळेल त्या साधनाने मोहाडीत पोहोचला. अन्‌ चक्क महिनाभर प्रेयसीच्या घरातच लपून बसला. पोलिसांच्या नजरेत आल्याने त्याची क्वारंटाइन सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली. या अनोख्या पुणेरी प्रेमवीराची चर्चा मोहाडीत रंगली आहे. 

कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन झाल्याने प्रेमीयुगुलांच्या गाठीभेटी थांबल्या आहेत. त्यांना सध्या विरहाचे सोस सहन करावे लागत आहे. परंतु, "प्यार करने वाले कभी डरते नही, जो डरते हैं, ओ प्यार करते नही' "हिरो" या चित्रपटातील गीताची प्रचिती यावी असे साहस तरुणाने केले आहे. त्याची प्रेयसी ही अल्पवयीन आहे. 

तिचे आई-वडील पुणे येथे एका खासगी कंपनीत नोकरीवर आहेत. आजी आणि आजोबा मोहाडीत राहतात. त्यांचा सांभाळ व देखभाल करण्यासाठी ही तरुणी आजोबांकडे राहत असून, बाराव्या वर्गात आहे. पुणे येथे गेली असताना तरुणीचे (भोसरी) पुणे येथील लहू नावाच्या 22 वर्षीय तरुणाशी सूत जुळले. तिच्या आजोबाला अर्धांगवायूचा आजार आहे. तर आजी बाजारात आले-लसूण विकते. 

महिनाभर होता धाब्यावर मुक्काम 

प्रेयसीच्या भेटीसाठी आतुर झालेल्या लहू याने मोहाडीत जाण्याचा निर्धार केला. लॉकडाऊनमध्ये फक्त अत्यावश्‍यक साहित्याची वाहतूक करणाऱ्या साधनांना प्रवासाची मुभा होती. त्यामुळे ट्रकने प्रवास करून तो प्रेयसीच्या घरी दाखल झाला. त्याला पाहताच तिच्याही आनंदाला प्रेमाचे भरते आले. घरच्यापासून त्याला लपवून ठेवण्यासाठी तिने त्याची कौलारू घराच्या छतावर (धाब्यावर) राहण्याची सोय केली. संधी मिळेल तेव्हा या दोघांचे प्रेम बहरू लागले. आजारी असलेले आजोबा खाटेवर आणि आजी व्यवसायानिमित्त बाजारात असल्याने परका व्यक्ती आपल्या घरात राहतो. हे त्यांना कळलेच नाही. 

असे फुटले बिंग 

तब्बल महिनाभर घराच्या ढाब्यावर लपून राहण्याचा त्यालाही कंटाळा आला होता. पाय मोकळे करण्यासाठी फिरून यावे म्हणून तो शनिवारी (ता. 20) घराबाहेर पडला अन्‌ अलगद पोलिसांच्या हाती लागला. मागच्या आठवड्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला आहे. रस्त्यावर नाकाबंदी असून, चोवीस तास पोलिसांची हजेरी असते. रस्त्यावर बाहेर पडलेल्या अनोळखी व नवख्या तरुणाला पाहून पोलिसांनी त्याची चौकशी केली. तेव्हा तो गोंधळला अन त्याचे बिंग फुटले. त्याच्या बोलीभाषेवरून पोलिसांना त्याची ओळख शोधण्यास वेळ लागला नाही. त्याने घडलेला सर्व प्रकार कथन केला. या पुणेरी प्रेमवीराची सध्या विलगीकरण कक्षात रवानगी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: नागपुरात विजांचा कडकडाटसह पावसाला सुरूवात...

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT