volvo bus
volvo bus 
विदर्भ

मुंबईत अडकलेल्यांना घ्यायला जात होता, मात्र त्यालाच आले `वरचे` बोलावणे 

सकाळ वृत्तसेवा

अमरावती  : कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी घोषित लॉकडाउनमध्ये मुंबईत अडकलेल्या नागरिकांना आणण्यासाठी निघालेल्या पश्‍चिम बंगालच्या खासगी लक्‍झरी बसचालकाचा बडनेरा येथे मृत्यू झाला. जीवनाचा प्रवास अर्ध्यातच थांबलेल्या चालकाचा मृतदेह खासगी रुग्णवाहिकेतून पश्‍चिम बंगालला त्याच्या घरी पाठविण्यात आला. 

सुखदेव दुलाल अधिकारी (वय 50) असे मृताचे नाव आहे. तो पश्‍चिम बंगालच्या इरुली राणाधार 112 डी नाडीया येथील रहिवासी होता. मुंबईत अडकलेल्या नागरिकांना आणण्यासाठी पश्‍चिम बंगालवरून व्हाल्वो लक्‍झरी बस (डब्ल्यूबी 51 ए 2388) घेऊन मालक विजय हलदार आणि चालक सुखदेव अधिकारी कोलकाता येथून 23 मे रोजी मुंबईकडे निघाले होते. बसमध्ये फक्त मालक आणि चालक असे दोनच व्यक्ती होते. अकोला मार्गावरील जुना नाका येथे सोमवारी (ता. 25) दुपारी दोनच्या सुमारास ते पोहोचले. यावेळी चालक सुखदेव यांची प्रकृती अचानक खालावल्याने मालक विजय हलदार यांनी 108 क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावून त्यातून सुखदेव यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या सावटात झालेला मृत्यू नेमका कशाने झाला, याविषयी शंका आल्याने तो प्लॅस्टिक कीटमध्ये बंदिस्त करण्यात आला. नगरसेवक दिनेश बूब यांनी खासगी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून दिली. रुग्णवाहिका चालक निरंजन खंडारे यांच्या मदतीला दोन कार्यकर्ते सोबत देऊन संबंधित मृतदेह त्याच्या गावी पाठविला. विजय हलदार बससह मुंबईच्या दिशेने रवाना झाले. सुखदेव अधिकारी यांचा मृतदेह कोलकता येथे त्यांच्या घरी पोहोचल्याचे नायक पोलिस शिपाई पुरुषोत्तम देवरे यांनी सांगितले. 

पश्‍चिम बंगालमध्ये वादळामुळे तेथील व्यवस्था कोलमडलेली आहे. देशभरातून सोडल्या जाणाऱ्या श्रमिक एक्‍स्प्रेसला प्रवेश देण्यास पश्‍चिम बंगाल सरकारने नकारघंटा चालविल्याने अखेरीस आपापल्या नातलगांना आणण्यासाठी तेथील नागरिक खासगी बसेस मुंबईकडे पाठवित आहेत. दिवसाला शेकडो लक्‍झरी बसेस मुंबईहून नागरिकांना घेऊन अमरावतीमार्गे कोलकात्याकडे जात आहेत. पश्‍चिम बंगालचे हजारो नागरिक अद्यापही मुंबईत अडकलेले आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT