deepali chauhan suicide  e sakal
विदर्भ

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : अखेर एम. एस. रेड्डीला नागपुरातून अटक

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : निलंबित अप्पर प्रधान मुख्य वनसरक्षक एम. एस. रेड्डी याला दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी बुधवारी मध्यरात्री नागपूर येथून अटक करण्यात आली.

25 मार्च 2021 रोजी मेळघाटच्या हरीसाल येथील वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यात गुगामल विभागाचे उपवन संरक्षक विनोद शिवकुमार विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली होती. परंतु, दीपाली यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या पात्रात उल्लेख असूनही रेड्डीवर सुद्धा गुन्हा दाखल करून अटक केली जावी, अशी आग्रही मागणी घटनेनंतर विविध पक्ष संघटनानी केली होती. परंतु, वरिष्ठ स्तरावर रेड्डीचे असलेले संबंध आणि आयएफएस लॉबीच्या दाबावामुळे ते शक्य होत नव्हते. दोन दिवसांपूर्वी आयपीएस अधिकारी प्रज्ञा सरवदे यांचा मेळघाट दौरा झाला. त्या बुधवारी सकाळी मुंबईला गेल्या. त्यानंतर 24 तासांतच रेड्ड ला नागपूर येथून अटक झाली. रेड्डीला आज गुरुवारी 29 एप्रिल रोजी नागपूरवरून धारणी आणले. दुपारी त्याला न्यायालयामध्ये हजर केले जाईल, असे धारणीचे पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT