Mahavitaran gives unemployed 'employment base' 
विदर्भ

महावितरणने बेरोजगारांना दिला ‘रोजगाराचा आधार’

सकाळ वृत्तसेवा

अकोला : महावितरणमधील विद्युत कामे बेरोजगार विद्युत अभियंत्यांना विना स्पर्धा थेट लॉटरी पद्धतीने देण्याचे धोरणाला बांधिल राहत अकोला मंडल कार्यालयाअंतर्गत करावयाच्या 22 लाख 51 हजाराच्या कामाचे वाटप पाच बेरोजगार विद्युत अभियंत्यांना करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी महावितरण अकोला जिल्ह्याने उपलब्ध करून दिली आहे.

नुकताच महावितरणच्या विद्युत भवन येथे आमंत्रित बेरोजगार अभियंत्यांच्या उपस्थितीत लॉटरी पद्धतीने या कामांचे वाटप करण्यात आले आले. यात जिल्हा विकास नियोजनाच्या ओटीएसपी म्हणजेच अनुसूचित जाती वगळता इतर मागास्वर्गीयांसाठी अकोला ग्रामीण विभागात करावयाचा कामाचा समावेश आहे. महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता यांच्या मार्गदर्शनात आणि अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या उपस्थितीत बेरोजगार अभियंतांना द्यावयाच्या कामाच्या लॉटरीची सोडत करण्यात आली. यात आमंत्रित केलेल्या नऊ बेरोजगार अभियंत्यांपैकी पाच अभियंतांना सुमारे 22 लाख 51 हजाराच्या कामाचे वाटप करण्यात आले आहेत. तर उर्वरित चार अभियंतांसाठी पुढील आठवड्यात लाॅटरीची सोडत होणार आहे. यावेळी उपकार्यकारी अभियंता गोर्ले यांच्यासह सर्व बेरोजगार अभियंते उपस्थित होते.

यापुर्वीही 30 सुशिक्षीत बेरोजगार अभियंताना काम
अकोला मंडळ कार्यालयाने यापुर्वीही म्हणजेच मागील चार वर्षांत 30 आणि ही पाच अशा एकूण 35 सुशिक्षीत बेरोजगार अभियंताना 6.07 कोटी रुपयाची विजेची कामे देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहेत. अकोला मंडळ कार्यालयात रोजगार मिळावे म्हणून आपल्या नावाची नोंदणी केलेल्या 39 पैकी 35 सुशिक्षीत बेरोजगार अभियंतानी काम देण्यात आले आहेत.

लॉटरी पद्धतीने कामे
विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा पदविकाधारक बेरोजगार अभियंत्यांना महावितरणतर्फे 10 लाख रुपयापर्यंतची कामे विना स्पर्धा थेट लॉटरी पद्धतीने देण्याचे धोरण आहे. या धोरणानुसार वर्षभरात एका अभियंत्याला 10 लाख रुपयाची पाच अशी एकूण 50 लाख रुपयाची कामे देण्यात येतात, ही कामे विहीत मुदतीत यशस्वीरित्या पूर्ण केल्यास पुढील वर्षी 15 लाख रुपयापर्यंतची पाच अशी एकूण 75 लाख रुपयाची कामे लॉटरी पद्धतीने दिल्या जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missile Attack Crude Oil Tanker : इस्त्राईल-इराण युद्धात क्रूड ऑईल जहाजावर क्षेपणास्त्र हल्‍ला, कोल्हापूरचा रोहित पाटील जहाजात; अनेकांना बहरीनमध्ये हलवलं

IND vs NZ Final: ७ सामन्यांत १२.७१ ची सरासरी अन् ८९ धावा! अभिषेक शर्मा OUT, रिंकू सिंग IN? वर्ल्ड कप फायनलसाठी भारताच्या Playing XI मध्ये दोन बदल अपेक्षित

Sukhoi Fighter Jet Crash : 'Purvesh Is No More..'! कॅप्टनचे ते शब्द ऐकताच पूर्वेशच्या वडिलांवर मोठा आघात; म्हणाले, 'छत्रपती शिवरायांचा त्याच्यावर..'

आगीत घर गमावलेल्यांना मोठी मदत! आग घटनेत बेघर झालेल्यांना जमीन देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय; पण नेमकं कुणाला आणि कुठे?

बायकोनं केलेला आरोप खरा ठरला? खरंच थलपती विजयचं अभिनेत्रीसोबत अफेअर? सोशल मीडियावर दोघांचा Viral Video

SCROLL FOR NEXT