file photo
file photo 
विदर्भ

चांदूरबाजारच्या संत्रामंडीला भीषण आग

सकाळ वृत्तसेवा

चांदूरबाजार (जि. अमरावती) : स्थानिक ब्राह्मणवाडाथडी मार्गावरील तीन संत्रामंडींना शनिवारी (ता. 8) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज असून यात सुमारे 80 लाखांचे नुकसान झाले.
संत्र्याची मुख्य बाजारपेठ म्हणून चांदूरबाजारची ओळख आहे. त्यामुळे शहरातील ब्राह्मणवाडाथडी मार्गावर दरवर्षी सात ते आठ संत्रामंड्या उभारण्यात येतात. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता अब्दुल सलीम शेख इकरीद यांची एक, तर अतिक अहमद सईद अहमद यांच्या दोन संत्रामंडींना आग लागली. यामध्ये अब्दुल सलीम शेख इकरीद यांच्या मंडीतील 30 लाख रुपये किमतीचे 35 हजार कॅरेट, 3 लाख रुपये किमतीचे टीनशेड व वजनकाटा जळून खाक झाला. तर, अतिक अहमद यांच्या दोन संत्रामंडीत संत्राबहार संपल्याने 16 टन टरबूज ठेवण्यात आले होते. येथील आगीत 8 लाख रुपये किमतीचे 11 हजार कॅरेट जळून खाक झाले. त्याचबरोबर 12 लाख रुपये किमतीची संत्रा वॅक्‍सिन मशीन, 8 लाख रुपये किमतीचे टीनशेड व दीड लाखाचे टरबूज जळून खाक झाले. ही आग शॉर्टसर्किटने लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. चांदूरबाजार येथील अग्निशमन दल, एच.जी. इन्फ्रा कंपनीच्या दोन टॅंकरसह अचलपूर येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग विझविली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT