Male Teacher missed behave with ladies passenger in nandura railway
Male Teacher missed behave with ladies passenger in nandura railway  
विदर्भ

रेल्वे प्रवासात अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाची महिलेकडून धुलाई

सकाळवृत्तसेवा

नांदुरा : शहरातील एका नामांकित महिला विद्या मंदिरात विद्येचे धडे शिकविणाऱ्या 'शिक्षका'ने रेल्वे प्रवासात एका महिलेसोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला असता सदर महिलेने त्या 'मनमोहन 'शिक्षकाची यथेच्छ धुलाई केल्याची चर्चा सध्या शहरात असून सदर धुलाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खमंग चर्चाना ऊत आला आहे.

सध्या पालकांमध्ये विद्यार्थाला उच्च शिक्षणासाठी इतर राज्यात पाठविण्याचे फॅड निर्माण झाले आहे. त्यासाठी जास्तीत जास्त पालकांची पसंती ही राजस्थान मधील कोटा येथे असल्याने व तेथे पाल्याची अॅडमिशन केली असल्याने या परिसरातील पालकांचे कामानिमित्त नेहमी येणे जाणे सुरू झाले आहे. नांदुरा शहरही त्याला अपवाद नसल्याने येथील कन्या विद्यालयाचे शिक्षक मनमोहन यांचेही पाल्य कोटा येथे शिक्षण घेत असल्याने  मनमोहन कोट्याला गेले व काम आटोपुन परतीच्या रेल्वे प्रवासाला लागले असता मलकापूर येथील महिला व हा नराधम शिक्षक प्रवासात एकत्र आले. या रेल्वे प्रवासात सदर शिक्षकाने या महिलेसोबत लगट करून अश्लील चाळे सुरू केले. सदर महिलेने ही बाब घरी आल्यानंतर आपल्या नातेवाईकाला सांगितली असता सदर शिक्षकाला नातेवाईकांनी मलकापूर येथे बोलावून 'त्या'महिलेने व त्यांच्या नातेवाईकांनी या मनमोहन शिक्षकाची यथेच्छ धुलाई केल्याची चर्चा नांदुरा शहरात रंगत आहे. सदरील धुलाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या फिरत असल्याने शहरात एकच चर्चांना ऊत आला आहे.

कन्या विद्यालयात शिक्षकी पेशाने कार्यरत असलेल्या या शिक्षकाने हे अशोभनीय कृत्य केले आहे. यापूर्वी सुद्धा या 'मनमोहन' शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत इलू इलू केल्याची चर्चा शहरात पसरत असल्याने कन्या विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या पालकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. शिक्षकाने नुकत्याच केलेल्या कृत्याबाबत संस्थाचालक या शिक्षकावर काय कारवाई करतात. याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले असून कारवाई न झाल्यास काही पालक याबाबत तक्रार करणार असल्याचे समजते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT