malur villagers demand to rehabilitate in melghat of amravati 
विदर्भ

चहूबाजूने घनदाट जंगल अन् हिंस्त्र प्राणी, साधा रस्ताही नाही; सांगा आम्ही जगायचं कसं?

संतोष ताकपिरे

अमरावती : मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील मालूर या गावच्या पुनर्वसनासाठी येथील काही ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येते. त्यासाठी विभागीय आयुक्तांसह मेळघाट व्याघ्रप्रकल्पाकडे तशी मागणी केली. 

गाभा क्षेत्रातील गाव असल्याने गावाच्या चहूबाजूने घनदाट जंगल आहे. सत्तर वर्षांमध्ये या गावात साधा डांबरी रस्ताही झाला नाही. पिण्याचे पाणी नाही. फक्त एक सोलरपंप आहे. शेतजमीनसुद्धा मुरमाळ आहे. गावात आजतागायत राज्य परिवहन महामंडळाची साधी एसटीही आलेली नाही. मोजून तीन विजेचे मीटर आहेत. वीजपुरवठा खंडित झाला की, तो परत केव्हा येईल, याचाही नेम नसतो. वन्यप्राण्यांच्या भीतीच्या छायेत जगावे लागते. सूर्यास्तानंतर घराबाहेर पडण्याची भीती वाटते. 40 किलोमीटरपर्यंत साधा दवाखानाही नाही. याच भागातील मांगिया गावचे शिरसगावकसबा येथे पुनर्वसन झाले. तेथील नागरिकांना मिळालेल्या सोयीसुविधा, दहा लाखांचे पॅकेज, व्यवसायाकरिता वाहने, पाण्याची सोय, रोजगार, मुलांच्या शिक्षणाची सोय झाली. त्यामुळे लवकरच मालूर गावाचेसुद्धा पुनर्वसन करावे, असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. दिवाळीनंतर काही जण बहिरम, तर काही वाघोली येथे पुनर्वसित होणार होते. परंतु, काही लोकांच्या हस्तक्षेपामुळे येथील पुनर्वसन प्रक्रिया थांबल्याचे कळताच काहींना धक्का बसला. अनेकांमध्ये वादविवाद सुरू झाले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. ऐच्छिक दृष्टीने होणाऱ्या पुनर्वसनाला परवानगी द्यावी, अशी विनंतीसुद्धा ग्रामस्थांनी केली.  

गावात आहेत दीडशे घरे -
गाभाक्षेत्रात सहभागी असलेल्या मालूर गावामध्ये अंदाजे दीडशेच्या आसपास घरे आहेत. साडेचारशे ते पाचशे लोकसंख्या असावी. एकूण 32 गावांपैकी आतापर्यंत 20 वर्षांत 22 गावांचे पुनर्वसन झाले असून 11 चे पुनर्वसन बाकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT