man attacked on girl because of single sided love  
विदर्भ

एकतर्फी प्रेमातून युवतीच्या पोटात खुपसला चाकू; आरोपीने घेतली वैनगंगा नदीत उडी 

चित्रा कापसे

तिरोडा (जि. गोंदिया)  ः एकतर्फी प्रेमातून युवकाने एका युवतीच्या पोटात चाकू खुपसला. यात युवती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना चांदोरी खुर्द येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अतुल ओमप्रकाश शिवणे (वय 26, रा. कापसी खुर्द, जि. नागपूर) असे आरोपीचे नाव आहे.

यातील पीडित युवती ही घरी स्वयंपाक करीत असताना अचानक अतुल घराच्या मागच्या बाजूने आला आणि तुला जिवानिशी ठार मारेन, असे म्हणत तिच्या पोटावर चाकूने हल्ला केला. युवतीने विरोध केला असता त्याने पुन्हा तिच्या पोटावर, गळ्यावर वार केला. यावेळी तिला हल्ल्यातून वाचविण्यासाठी तिची आई धावून आली. मात्र, आरोपीने तिच्या आईलादेखील खाली पाडले. दोघींनीही आरडाओरड केल्यानंतर शेजारचे धावून आले. त्यामुळे आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

दरम्यान, गावकऱ्यांनी आरोपीचा पाठलाग केला असता, आरोपीने वैनगंगा नदीत उडी घेतली. गावकऱ्यांनी त्याला नदीतून बाहेर काढत चांगलेच चोपले. उल्लेखनीय म्हणजे, आरोपी युवकाने यापूर्वीदेखील पीडित युवतीला अनेकदा त्रास दिला. तसेच तिचे अपहरण केले होते. त्याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकही करण्यात आली होती.

तथापि, या घटनेची माहिती तिरोडा पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन यादव, ठाणेदार उद्धव दमाळे, पोलिस उपनिरीक्षक लाला लोणकर, कर्मचारी अमरसिंग वसावे, राधा लाटे, मुकेश थेर, गिरीश पांडे ,सव्वालाखे यांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता गावकऱ्यांनी पोलिसांना विरोध करून आरोपीला आम्ही शिक्षा देऊ असा पवित्रा घेतला. त्यामुळे गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. 

दरम्यान, गावात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, म्हणून गोंदिया पोलिस मुख्यालयातून अतिरिक्त पोलिस कुमक मागविण्यात आली होती. तेव्हा आरोपीला ताब्यात घेऊन उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे पाठविण्यात आले. हल्ल्यातील जखमी युवतीला उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे भरती करण्यात आले आहे. सध्या चांदोरीत तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

SCROLL FOR NEXT