Man did fraud of 650 Grams from woman and sister in Amravati district  
विदर्भ

अमरावतीत चौघांची मोठी फसवणूक; माय-लेकींकडून लुबाडले तब्बल 65 तोळे दागिने

संतोष ताकपिरे

अमरावती ः घर खरेदी करून देण्यासह प्लॉट विक्रीचे आमिष दाखवून एका त्रिकुटाने वरुड येथील चौघांची 28 लाख 43 हजारांनी फसवणूक केली. वरुड पोलिसांनी तिघांविरुद्ध अपहार, फसवणुकीसह जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. 

दीपक शिवरारायण बटवाडा, प्रवीण धरमठोक व एक महिला (सर्व रा. वरुड) अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले. महेंद्र गंगाधर काठीवाले (वय 35, रा. वरुड) यांच्या तक्रारीवरून वरुड पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. श्री. काठीवाले यांची आई आणि दोन बहिणी यांना घर खरेदी करण्याचे कारण सांगून तिघींजवळून 19 लाख 53 हजार रुपये किंमतीचे 65 तोळे सोन्याचे दागिने घेतले. 

याव्यतिरिक्त सुजित मारोतराव खेर्डे (वय 47), विकास टेमघरे (वय 48) व योगेश विष्णुपंत गणोरकर (वय 47) या तिघांना प्लॉट विक्री करण्याचे कारण सांगून त्यांच्याकडून एकूण 8 लाख 90 हजार रुपये घेतले. चौघांकडून 28 लाख 43 हजारांचा ऐवज हडपून फसवणूक केल्याचा आरोप आहे. नमूद तिघांनी संबंधितांकडे पैशाची मागणी केली असता त्यांनी अनेकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. 

बनावट फेसबुकवरून पैसे वसुली

डॉ. जयंत पंडित काशीकर (वय 40, रेणुकानगर, वरुड) यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्यांच्या ओळखीतील अनेकांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली. ज्यांनी फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकारली त्यापैकी अनेकांना तोतयाने विविध कारणे सांगून पैशाची मागणी केली. डॉ. काशीकर यांचे मित्र पंकज मनोहर जावळे यांनी तोतयाची फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकारून त्याला पाच हजार रुपये ऑनलाइन पाठविले. आपल्या नावाचा गैरवापर करीत असल्याचे उघडकीस येताच डॉ. काशीकर यांनी पोलिसांत तक्रार केली. वरुड पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. 

फसवणूकप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल.
-श्रेणिक लोढा, 
परिविक्षाधीन आयपीएस, पोलिस निरीक्षक वरुड.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टात काय घडलं? न्यायाधीशांनीच दिला कोर्टासमोर आंदोलन करण्याचा इशारा, प्रशासनावर तीव्र नाराजी

IND vs NZ: न्यूझीलंड दौऱ्यासाठी कर्णधार शुभमन गिल मास्टरप्लॅन, स्वत:च्या खर्चानेच ५ गोलंदांजाना सोबत नेणार

एक्सप्रेस वेवर मृत्यूचं तांडव! भाविकांच्या ट्रॅव्हलरचा भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, १५ जण जखमी

Mumbai Local: देवीच्या दर्शनासाठी लोकल प्रवास करताय? वेळापत्रक पहाच, 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; अनेक रेल्वे सेवा रद्द

Latest Marathi News Live Update : यल्लम्मा देवीचे दर्शन घेऊन परतताना हसन मुश्रीफ यांचे वाहन शेतकऱ्यांनी अडवले, गोकाकजवळील घटना

SCROLL FOR NEXT