Man did fraud with old man in Yavatmal  
विदर्भ

संपूर्ण आयुष्य राबून कमावलेले पैसे एका क्षणात झाले गायब; पेन्शनच्या पैशावर अनोळखी व्यक्तीने केला हात साफ

रवींद्र शिंदे

दिग्रस  (जि.यवतमाळ) : माळहिवरा आश्रमशाळेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याने आयुष्याची पुंजी म्हणून बॅंकेत ठेवलेली पेन्शनची दोन लाखांची रक्कम अनोळखी व्यक्तीने काढली. याप्रकरणी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

कुरुमदास फकिरा राठोड (वय 58, रा. वाईगौळ) असे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे नाव आहे. सध्या ते शेती करतात. भारतीय स्टेट बॅंकेच्या खात्यात त्यांनी पेन्शनचे पैसे जमा केले हाते. तीन ते 16 डिसेंबर या कालावधीत त्यांच्या खात्यात जमा असलेले दोन लाख पाच हजार रुपये एटीएमच्या माध्यमातून काढण्यात आले.

तीन डिसेंबरला महाराष्ट्र बॅंकेच्या एटीममधून दहा हजार रुपये विड्रॉल केले. खात्यातून पैसे तर कटले मात्र, एटीएममधून पैसे आले नाहीत म्हणून त्यांनी महाराष्ट्र बॅंकेत विचारणा केली. त्यांनी स्टेट बॅंकेत जाऊन विचारणा केली. बॅंक अधिकाऱ्यांनी त्यांना टोल फ्री क्रमांकावर संपर्क करायला सांगितले. 

त्यांना बैलजोडी घ्यायची असल्याने बुधवारी (ता.16) बॅंकेत गेले. स्टेट बॅंकेत येऊन 30 हजारांचा विड्रॉल दिला असता, खात्यात पैसे नसल्याचे उत्तर मिळाले. खात्यात पैसे नसल्याचे ऐकताच राठोड यांना धक्का बसला. लगेच स्टेटमेंट काढून तपासणी केली. तीन ते 13 डिसेंबर कालावधीत दररोज दोन ते तीन वेळा दहा हजार काढल्याची एंट्री होती. तर 14 ते 16 डिसेंबरपर्यंत एकवेळ दहा हजारांची तर चारवेळा साडेचार हजार रुपये विड्रॉल केल्याचे दिसून आले. 

अशाप्रकारे अनोळखी व्यक्तीने दोन लाख पाच हजार रुपयांच्या रकमेवर हात साफ केला. दिग्रस पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत तपास सुरू केला आहे. यासंदर्भात बॅंक व्यवस्थापकांशी संपर्क केला असता, बैठकीसाठी ते बाहेरगावी असल्याने संपर्क होऊ शकला नाही.

कुरुमदास राठोड हे तीन डिसेंबरला एटीएममध्ये गेले तेव्हापासूनच त्यांच्या खात्यातून पैसे विड्रॉल झाल्याचे स्टेटमधून दिसत आहे. बॅंकेतून सर्व अहवाल मागितला असून, एटीएमचे सीसीटिव्ही फुटेजसुद्घा मागितले आहे. सोबतच त्यांनी याबाबत कुणाशी चर्चा करून एटीएमचे डिटेल दिले का, याची चौकशी सुरू आहे. सर्व बाबींची पडताळणी केल्यावर पैसे कुणी काढले, याचा उलगडा होईल.
- सोनाजी आम्ले, 
ठाणेदार, दिग्रस.


संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Shroff shooting incident : टायगरला फोन करून समजावलं होतं, पण...; बिश्नोई गँगनं घेतली हल्ल्याची जबाबदारी

CEC Gyanesh Kumar Row : देशातील संघर्ष आता आंतरराष्ट्रीय स्तरावर! लंडनमधून ध्रुव राठीचा थेट हल्लाबोल, म्हणाला...

Marathwada Graduate Election 2026: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट! ४० हून अधिक आजी-माजी आमदार, खासदार मतदानापासून वंचित?

Solapur Politics : ऐन मतदानाच्या तोंडावर शरद पवारांना सर्वात मोठा धक्का; सोलापुरातील ३ आमदारांचा थेट भाजपला पाठिंबा, नेमकं काय घडलं?

Video: टायगर श्रॉफवर गोळीबार; दुचाकीवरून आले तीन हल्लेखोर,धक्कादायक व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT