विदर्भ

वाघिणीसह दोन वाघांच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू

मनोज रायपुरे

कारंजा (जि. वर्धा) : तालुक्यातील राहटी शिवारातील जंगल बिट क्रमांक ५३ मध्ये तेंदूपत्ता आणायला गेलेल्या इसमावर तीन वाघांनी हल्ला (tiger attack) केला. यात इसमाचा जागीच मृत्यू झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. (Man dies in attack of three tigers in Wardha)

नांदोरा येथील मुकुंद हिरामण ढोके (वय ५८) हे पत्नी व मुलांसोबत जंगलात तेंदूपत्ता आणण्यासाठी गेले होते. वडील काही अंतरावर तेंदूपत्ता तोडायला गेले असता परत आलेच नाही. वडील आवाज देऊनही येत नसल्याने मुलाने गावातील नागरिकांना बोलावून आणले. जंगलात पाहणी केली असता तीन वाघ वडिलांना ओढत नेताना दिसले. यात मुकुंद ढोके यांचा जागीच मृत्यू झाला.

माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी, पोलिस प्रशासन पोहोचून पंचनामा केला. यावेळी तातडीचे एक लाखाची मदत मृताच्या नातेवाइकांना वनविभागकडून देण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. गायनेर यांनी सांगितले. वनविभागाचे कर्मचारी एल. एन. माहुरे, जी. बी. लखेकर, डब्लू. आर. ढोबाळे, डी. एन. खरबडे, पोलिस उपनिरीक्षक सचिन मानकर, पूनम गिरडकर, पोलिस जमादार किशोर कडू, हर्षवर्धन मुन, किशोर कापडे यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थित होते.

(Man dies in attack of three tigers in Wardha)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganpati in Texas: अमेरिकेत दुमदुमला कसबा गणपतीचा जयघोष ; ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळाकडून पुण्याच्या ग्रामदैवताची प्रतिष्ठापना

Viral Video : विमान हवेत असताना दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latur Crop Loss: निलंगा तालुक्यात खरीप पीक शंभर टक्के उद्ध्वस्त; कृषी विभागाच्या ‘७० टक्के’ अहवालावर शेतकऱ्यांचा संताप

Sahyadri Sugar Mill: सह्याद्री साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; घोषणाबाजी, गदारोळ आणि तणावपूर्ण वातावरण

Malegaon Tractor Attack Case: माळेगावात ट्रॅक्टरने जीवे मारण्याचा प्रयत्न; नरूटे कुटुंबीयांवर हल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT