Man end life of his sister in Hinganghat wardha  
विदर्भ

ज्या बहिणीला दिलं होतं रक्षणाचं वचन तिच्यावरच केले चाकूनं वार; सख्ख्या भावानं केली अमानुष हत्या 

सकाळ वृत्तसेवा

हिंगणघाट (जि. वर्धा)  : पैशाच्या वादातून भाऊ आईला मारहाण करीत असल्याचे दिसताच भांडण सोडविण्यासाठी थोरली बहीण मध्ये पडली. यात संतापलेल्या भावाने बहिणीवर चाकूने वार केला. यात गंभीर जखमी होऊन बहिणीचा शनिवारी (ता. 27) मृत्यू झाला. या प्रकरणी भावावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगणघाट पोलिस ठाण्यांतर्गत तरोडा येथील पारधी बेड्यावर ही घटना घडली. स्मिता सगुणाथ पवार असे मृताचे तर अमित चूंगदेव राऊत (वय 31) रा. तरोडा पारधी बेडा असे आरोपीचे नाव असून आरोपीला हिंगणघाट पोलिसांनी अटक केली आहे.

तरोडा येथील पारधी बेड्‌यावर राहणाऱ्या अमित राऊत याचा पैशासाठी आपल्या आई सोबत वाद सुरू होता. या दरम्यान स्वतःच्या आईला अमित मारहाण करीत होता. याची माहिती अमितची थोरली बहीण स्मिता सगुणाथ पवार ही आईला का मारतोस म्हणून आपल्या भावाला अडवीत होती. यामुळे अमितने तिच्यावर चाकूने सपासप वार केले. यात स्मिता गंभीर जखमी होऊन रक्‍ताच्या थारोळ्यात पडली.

जखमी स्मिता पवारला उपचारासाठी म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले होत. मृतक स्मिता पवारच्या फिर्यादीवरून आरोपी अमित चुंगदेव राऊत विरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. रुग्णालयात उपचार करून घरी परत आल्यानंतर स्मिताची प्रकृती खालवल्याने ती भोवळ येऊन खाली कोसळली. यातच तिचा मृत्यू झाला. 

यामुळे या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून यातील आरोपी अमित राऊत यास याला हिंगणघाट पोलिसांनी अटक केलेली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पी. आर. पाटणकर यांनी केली.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मुंबई पुणे एक्सप्रेस वे'वर वाहतूक कोंडीतही टोल वसुली, मनसेच्या दणक्यानंतर पैसे परत करण्याचं IRBचं आश्वासन

T20 WC, IND vs PAK: भारतीयांसमोर पाकच्या फिरकीचे आव्हान; सायंकाळपर्यंत पावसाचा अंदाज, मात्र त्यानंतर खेळ होण्याची शक्यता

CM Yogi Adityanath: लाडक्या बहिणींना १५०० रुपये पेन्शन; योगी सरकारची मोठी योजना, पाहा कोणा-कोणाला होणार फायदा

Ind vs Pak: यालाच म्हणतात तयारी! पाकिस्तानला भिडण्यासाठी सूर्यकुमार यादव बनला ‘उस्मान तारिक’, नेट्समध्ये गोलंदाजीची हुबेहूब नक्कल

Satara Tourist Death: सातारच्या पर्यटकाचा राजगडावर हृदयविकाराने मृत्यू; सकाळीच्या सुमारास बालेकिल्ल्याचे दर्शन घेतलं अन् काय घडलं?

SCROLL FOR NEXT