gondia 
विदर्भ

दारू पिताना पोलिसांनी पाहिले म्हणून पळाला आणि दुस-या दिवशी सापडला मृतदेहच

सकाळ वृत्तसेवा

आमगाव ( जि. गोंदिया) : टाळेबंदीमुळे अनेक दिवस दारूची दुकाने बंद होती. आता दारू मिळणे सुरू झाल्याबरोबर पिणा-यांनी अतिरेक करणे सुरू केले आहे.
 मित्रासह दारू पीत असताना अचानक पोलिस आल्याचे पाहून पळालेल्या एका तरुणाचा विहिरीत मृतदेह सापडला. ही घटना आज, शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास फुक्कीमेटा येथे उघडकीस आली.
डीलेश्वर श्रावण मेश्राम ( वय २०, रा. फुक्कीमेटा) असे मृताचे नाव आहे.
डीलेश्वर मेश्राम हा आपल्या एका मित्रासह १४ मे रोजी रात्री ८ च्या सुमारास गावशेजारील आडोश्याच्या जागेत दारू पीत होता. याचवेळी त्यांच्याजवळून पोलिसांची  गाडी गेली. पोलिस आपल्याकडे आले असे वाटल्याने दोघेही पळाले. डीलेश्वर घरी पोहोचलाच नाही.

काल, शुक्रवारी शोध घेऊनही तो कुठेच न  सापडल्याने अखेर कुटुंबियांनी पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. आज, सकाळी ८ च्या सुमारास निर्माणधीन गावशेजारील विहिरीत त्याचा मृतदेह तरंगताना आढळला. पुढील तपास आमगाव पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Post-Pregnancy Guidelines: मातृत्व की करिअर? महिला क्रिकेटपटूंचा गोंधळ मिटवण्यासाठी ICC चा ऐतिहासिक निर्णय; नियमावली जाहीर

Lucknow Fire: ''वाचवा..वाचवा...!''छताचा दरवाजा लॉक अन् निष्पाप मुलं जिवाच्या आकांताने ओरडत होते; लखनऊ जळीतकांडाचा थरारक अनुभव

रात्रीची वेळ, एसटी बसमध्ये अंधार; कंडक्टरचं महिलेशी गैरवर्तन, वाशिम-छत्रपती संभाजीनगर बसमधील प्रकार...

Umarga News : माजी मंत्री बसवराज पाटील यांची राजकारणात पुन्हा 'दमदार एन्ट्री'

IPL 2027 Trade! हार्दिक जाणार, सुर्याही जाणार.. मग Mumbai Indians चे नेतृत्व कोण करणार? जसप्रीत नाही, रोहितचा लाडका होणार कॅप्टन

SCROLL FOR NEXT