man i no more due to sinking in drainage  
विदर्भ

शौचास गेलेल्या बावीस वर्षीय युवकाचा नाल्यात बुडून मृत्यू; एक तासानंतर सापडला मृतदेह 

सतीश घारड

टेकाडी (जि. नागपूर): वेकोली परिसरातील नाल्याकाठावर शौचास गेलेल्या २२ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.घरी पाहुणे आले असल्याने मृतक युवक हा बाहेर नाल्यात शौचासाठी आलेला होता दरम्यान तोल गेल्याने तो नाल्याच्या खोल पाण्यात पडला.

तब्बल एक तासाच्या प्रयत्नानंतर मृतक युवकाला नाल्याच्या बाहेर काढण्यात यश आल्यानंतर रुग्णालयात त्याला मृत घोषित कररण्यात आले होते.निखिल सुखलाल गजभिये वय २२ राहणार शिवनगर,कांद्री वार्ड नंबर ४ अशे मृत युवकाचे नाव आहे.

फिर्यादी निकेश चवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार सकाळी ११ च्या सुमारास मृतक निखिल हा कांद्री शिवार अंतर्गत असलेल्या वेकोली परिसरातील नाल्याच्या काठावर शौच करायला गेलेला होता.दरम्यान बाहेर निघतांना त्याचा पाय घसरून तो नाल्यात पडला असावा अशी माहिती काही लोकांनी निखिलच्या कुटूंबियांन दिली.कन्हान पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटना स्थळ गाठले 

परंतु नाल्यातील पाण्याची पातळी जास्त असल्याने निखिलला बाहेर निघता जमेना मदतीला आलेल्या नागरिकांनी तब्बल एक तास प्रयत्न करून निखिलला कशे बशे बाहेर काढून तात्काळ कामठी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते.

कन्हान पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदना साठी ताब्यात घेतले.निखिलच्या मृत्यू नंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून त्याच्या मागे आई वडील आणि एक बहीण असा मोठा कुटूंब आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT