man killed in tiger attack in chandrapur 
विदर्भ

पोटाची खळगी भरण्यासाठी जंगलात गेला, दबा धरून बसलेला वाघ दिसला अन् सर्वच संपलं

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : जंगलात मोहफूल वेचताना वाघाने हल्ला करून एकाला ठार केले. ही घटना सिंदेवाही तालुक्‍यातील शिरकाळा येथे शनिवारी (ता. ३) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. श्रीधर आत्राम, असे मृत व्यक्तीचे नाव आहे. 

ग्रामीण भागात सध्या मोहफूल वेचण्याचा हंगाम सुरू आहे. मोहफूल वेचण्यासाठी पहाटेच्या सुमारास अनेक नागरिक जात असतात. सिंदेवाही तालुक्‍यातील शिरकाळा येथील श्रीधर आत्राम हे नेहमीप्रमाणे काही नागरिकांसोबतच गावालगतच्या जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेले होते. मोहफूल वेचत असताना झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. 

वाघाने हल्ला केल्यानंतर आरडाओरड झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर वाघाने तेथून धूम ठोकली. या घटनेची माहिती गावकऱ्यांना देण्यात आली. वनविभागालाही माहिती देण्यात आली. वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. वनविभागाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT