शिरजगावकसबा : अशा अवस्थेत चिमुकलीला अंधारात बेवारस सोडले होते.  
विदर्भ

चिमुकलीला अंधारात बांधून तो झाला मोकळा

सकाळ वृत्तसेवा

शिरजगावकसबा (जि. अमरावती) : महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या दिवशी महालक्ष्मीचे आगमन होते, घराघरांत पूजा होते, त्याच दिवशी जिल्ह्यातील बोदड गावात ही घटना घडली होती. चिमुकलीला चिंधीने हात बांधून अंधारात बेवारस सोडून दिल्याच्या घटनेच्या सूत्रधारासह पोलिसांनी अटक केली.
 
गावातील रमेश तुळशीराम सोलव (वय 68, रा. बोदड) यांच्या घराच्या लोखंडी गेटच्या बाहेर कुणीतरी चिंधीने एका चिमुकलीला हात बांधून बेवारस सोडून दिले होते. त्यावेळी सोलव यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मुलीच्या पालकांचा गावात शोध घेतला. परंतु, चिमुकली गावातील नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शिरसगावकसबा पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन अमरावती येथील बेबी केअर सेंटरमध्ये पाठविले. बोदड येथील घटनेचे रहस्य दोन महिन्यांनी उघडकीस आले.

आरोपीला बुधवारी केली अटक

श्री. सोलव यांचे जावई स्वप्नील ऊर्फ मुन्ना अजाबराव खरपे (वय 32, रा. अडुळाबाजार) याचे व मुलीचे कौटुंबिक कारणाहून पटत नव्हते. त्यामुळे श्री. सोलव यांची मुलगी ही माहेरी बोदड गावात राहत होती. जावई स्वप्नील हा सासऱ्यांसोबतही नेहमीच वाद घालत होता. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे त्यांनी पोलिसांना कळविले होते. तो काही दिवसांपासून पसार असल्यामुळे शिरसगावकसबा पोलिस त्याच्या मागावर होते. त्याला बुधवारी (ता. 11) अमरावतीच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून शिरसगावकसबा पोलिसांनी पकडले.

 पहिल्या पत्नीसोबत पटत नव्हते

पहिल्या पत्नीसोबत पटत नसताना स्वप्नीलच्या आयुष्यात दुसऱ्या एक मुलीची आई असलेल्या महिलेने प्रवेश केला. त्याने त्या महिलेला लग्नाचेही आमिष दाखविले होते. परंतु, प्रेयसीला पहिल्या पतीपासून असलेली दहा महिन्यांची चिमुकली त्यांच्या आयुष्यात अडसर ठरत होती. स्वप्नीलने मुलीला दत्तक देऊ, असे प्रेयसीला सांगितले होते. परंतु ते शक्‍य झाले नाही.


दोघेही न्यायालयासमोर हजर

त्यामुळे स्वप्नीलने प्रेयसीच्या दहा महिन्यांच्या चिमुकलीला बोदड गावात राहणारे सासरे रमेश सोलव यांच्या घराबाहेर चिंधीने हातपाय बांधून बेवारस सोडून दिले होते. त्यात त्यांच्या विवाहित प्रेयसीचासुद्धा सहभाग असल्याचे त्याने पोलिसांना कळविले. पोलिसांनी त्या चिमुकलीच्या आईलासुद्धा अटक केली. दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने चिमुकलीची आई आणि तिचा विवाहित प्रियकर या दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

स्वप्नील होता जिल्ह्यातून तडीपार

स्वप्नील ऊर्फ मुन्ना खरपे विरुद्ध जिल्ह्यातील विविध ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तो सराईत म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डवर होता, असे पोलिस निरीक्षक अशोक कांबळे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट ! महागाईच्या पार्श्वभूमीवर ५०% DA मर्जर होणार ?

T20 WC, IND vs WI : शिमरोन हेटमायरच्या विकेटवरून 'राडा'! विडींजच्या खेळाडूंची तीव्र नाराजी, वातावरण तापले; जसप्रीतने दिले २ धक्के

Pune News: पुणे, पिंपरीतील ५९ ‘आरएमसी’ प्रकल्पांना टाळे; हवेत विष कालविल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई!

Palghar News: जलमार्गाने प्रवास सुखकर! 'जलसार ते मारंबळपाडा'दरम्यान एक लाख प्रवाशांचा टप्पा पार

Sangrampur News: संग्रामपुरात आदिवासींची होळी; भोंगर्‍या बाजाराने रंगला सातपुडा, होळीची काय आहे लोककथा?

SCROLL FOR NEXT