marriage 
विदर्भ

बोंबला...! कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर वाढली लग्नपंगत... मग

संदीप रायपुरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर)  : चवथ्या लॉकडाउनमध्ये शासनाने लग्नाला परवानगी दिली अन्‌ त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. लगेच लग्नाची नवीन तारीख जाहीर झाली. थोडक्‍यात सारी तयारी करून काही मोजक्‍या नातेवाईकांची वरात वधूमंडपी पोहोचली. लग्नही शांततेत पार पडले. "दुल्हन हम ले जायेंगे' म्हणत तो तिला घेउन परतला. दोन दिवस लोटले अन्‌ वधुच्या गावात एक कोरोनाबाधित निघाला. त्या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्यांनी या लग्नात पंगत वाढल्याची माहिती समोर आली. त्यामुळे लग्नात उपस्थितांची चांगलीच भंबेरी उडाली. या प्रकारानंतर आता नवदाम्पत्यासह लग्नात उपस्थितांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

कोरोनाच्या महासंकटाने सामान्य जीवन विस्कळीत झाले आहे. कधीकाळी ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे 19 रुग्ण आढळल्याने परिस्थिती गंभीर होत आहे. अशात गावागावांतील नागरिकांचे आपल्या जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती काय याकडे लक्ष आहे. गोंडपिपरी तालुक्‍यातील चेकपिपरी येथील एका तरुणाचा बल्लारपुरातील विसापूर येथील तरुणीसोबत विवाह जुळला. अशात कोरोनाच्या सावटात त्यांना आपलं लग्न थांबवावं लागलं. अशात लॉकडाउन चारमध्ये प्रशासनाने मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत विवाह करण्याची परवानगी दिली. ही सुवर्णसंधी सोडायची नाही हा विचार करीत दोन्ही कुटुंबीयांनी 19 मे रोजी विवाह करण्याचे ठरविले. लग्नाची रितसर परवानगी घेण्यात आली. त्यानंतर आपल्या जवळच्या नातेवाईकांना सोबत घेत नवरदेव विसापूर येथे गेला. सामाजिक रितीरिवाजानुसार त्यांचे लग्न शांततेत पार पडले. लग्नानंतर वऱ्हाड्यांना जेवण देण्यात आले. कोरोनाच्या काळात लग्न संपन्न झाल्याच्या आनंदात वधूला घेत नवरदेव अन्‌ वऱ्हाडी चेकपिपरीला परतले. 

नवदाम्पत्यही गृह विलगीकरणात

यानंतर दोनच दिवसात चंद्रपुरात नऊ कोरोनाबाधित सापडल्याची धक्कादायक बातमी आली. यात विसापूरच्या एकाचा समावेश होता. प्रशासनाने केलेल्या चौकशीनंतर कळले की, विसापूरच्या कोरोनाबाधितांच्या संपर्कात तेथील एक व्यक्ती आला होता. याच व्यक्तीने 19 मे रोजी झालेल्या विवाहात लग्नपंगत वाढली होती. चेकपिपरीत ही माहिती समजताच अनेकांना धक्का बसला. प्रशासनाने तातडीने कारवाई करीत लग्नात गेलेल्या वऱ्हाडींना गृह विलगीकरण केले. इकडे चेकपिपरीत नवदाम्पत्यांना गृह विलगीकरण करण्यात आले. तिकडे लग्नपंगत वाढणाऱ्या व्यक्तीलाही क्वारंटाइन करण्यात आले. कोरोनाच्या संकटाने सारीकडे भीती अन्‌ असुरक्षेची चिंता नागरिकांत आहे. अशावेळी लग्नपंगत वाढणारा कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने आता नवीन चिंता आहे. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह निघावा, अशी प्रार्थना आता सारेच करीत आहेत. 

धाबा चेकपिपरीकडे लक्ष 

दोन दिवसांपूर्वी गोंडपिपरी तालुक्‍यातील धाबा येथे कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेला व्यक्ती सापडला होता. त्यामुळे आता धाबा व विसापूर येथील कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा रिपोर्ट नेमका काय येतो याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. 


विसापूर येथील लग्नात कोरोनाबाधितांच्या संपर्कात असलेला व्यक्ती उपस्थित होता. याची माहिती कळताच या लग्नात गेलेल्यांना होमक्वारंटाइन करण्यात आले. नवदाम्पत्यांनादेखील क्वारंटाइन केले आहे. 
सीमा गजभिये, तहसीलदार, गोंडपिपरी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane DCC Bank : ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंच्या 'चाणक्यनीती'मुळे बविआचा गेम ओव्हर, नवे अध्यक्ष कोण?

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

Latest Marathi News Update : देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चेला उधाण, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

'तू का आला नाहीस?' असं म्हणत न जन्मलेल्या बाळाला पत्रं लिहायच्या ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी, बसलेला मानसिक धक्का

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT