यवतमाळमधील गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार sakal
विदर्भ

यवतमाळ : पांढरकवडा येथील गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार

पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात

सतीश पुल्लजवार

पांढरकवडा (जि. यवतमाळ) : गावरान शेतजमिनीवर गुरे चारणार्‍या गुराख्यावर वाघाने हल्ला केल्याने गुराखीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. २०) तालुक्यातील वांजरी येथे घडली. गुलाब कवडू कुंचमवार (वय ४५) असे मृत गुराखीचे नाव आहे.

गुराखी गुलाब कुंचमवार हा बुधवारी गुरे चारण्यासाठी शेतशिवारात गेला होता. मात्र, दुपारनंतर चरताचरता जनावरे इतरत्र भरकटून गेले. त्यामुळे जनावरे शोधत गुलाब जंगल परिसरात गेला. रात्री उशिरापर्यंत गुलाब घरी परत आला नाही.

म्हणून नातेवाइकांसह गावातील ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकार्‍यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर जंगल परिसरात सर्वत्र शोधमोहीम सुरू झाली. दरम्यान, रात्री उशिरा गुलाबचा मृतदेह जंगलात आढळून आला.

वाघाने गुलाबच्या शरीराचे लचके तोडल्याचे निदर्शनास आले. यावेळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेनंतर वांजरीसह परिसरातून हळहळ व्यक्त केली जात असून, शेतकर्‍यांसह शेतमजुरांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adult Content Addiction : अडल्ट कंटेंट पाहणे दारु अन् सिगारेटच्या व्यसनापेक्षाही घातक; डॉक्टरांनी तरुणाईला दिला धोक्याचा इशारा

Trump On Modi : रशियाच्या तेलावरून पुन्हा ‘ट्रम्प बाँब’, खरेदी थांबविण्याचे पंतप्रधान मोदींकडून आश्वासन मिळाल्याचा दावा

Solapur Fraud: 'मुंबईच्या व्यापाऱ्याला बार्शीत १२ लाखांना गंडवले'; पोकलेन मशिन खरेदीतून भागीदारी व्यवसायाचे आमिष

Maharashtra Elections : चार दिवसांत साडेसहा लाख मतदार कसे वाढले? काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा निवडणूक आयोगाला सवाल

Vasubaras 2025: वसुबारसेच्या दिवशी कामधेनुची मूर्ती घरात कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

SCROLL FOR NEXT