man in yavatmal made multipurpose water resistance solution  
विदर्भ

'लोकल टू ग्लोबल' संशोधनाची भरारी; अजय विश्वकर्मा यांचे 'मल्टिपर्पज वॉटर रजिस्टंट सोल्यूशन' बाजारपेठेत दाखल

दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ) : उपयोजित तंत्रज्ञानाचा उपयोग करून संशोधनातून पुसद येथील अजय विश्वकर्मा या युवा तंत्रज्ञाने तयार केलेल्या 'मल्टिपर्पज वॉटर रजिस्टंट सोल्यूशन'या उत्पादनाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारतासाठी त्यांचा हा 'लोकल टू ग्लोबल' संशोधन प्रकल्प उल्लेखनीय ठरला आहे.

पुसद येथील मोबाईल तंत्रज्ञानातील व्यावसायिक अजय विश्वकर्मा यांनी जिज्ञासू वृत्तीने काही नावीन्यपूर्ण संशोधन केले. त्यांनी तयार केलेले प्रकल्पाचे पेटेंट मंजूर झाले असून साई-वीर टेक्‍नॉलॉजी या माध्यमातून उत्पादनाच्या स्वरूपात बाजारपेठेत उपलब्ध झालेले आहेत. यापैकी 'मल्टिपर्पज वॉटर रजिस्टंट सोल्यूशन' हे उत्पादन सरफेस माउंट डिवाइस कॉम्पोनंट व सरफेस माउंट टेक्‍नॉलॉजी यावर आधारित इलेक्‍ट्रॉनिक गॅजेट्‌स मध्ये उपयोगात आणले जाते.

हे उत्पादन म्हणजे एक प्रकारचे लिक्विड स्प्रे असून ते फवारल्यानंतर डिवाइसच्या पृष्ठभागाची पाण्याचा संपर्क होऊ शकत नाही. त्यामुळे गंज तयार होऊ शकत नाही. आर्द्रता व जंग प्रतिरोधक गुणधर्मामुळे डिव्हाईसेसला संरक्षण मिळते. कम्युनिकेशन डिवाइसेस, लॅपटॉप आयपॅड, स्ट्रिटलाइट्‌स या पाण्याची भीती असलेल्या उपकरणात तसेच औद्योगिक क्षेत्रातील कुलर, बाथरूममधील दरवाजाच्या इंजिस, नट बोल्ट, स्क्रू यासाठी वापर होऊ शकतो. याच्या उत्पादन विक्रीची व्यवस्था एका कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. या उत्पादनाची किमत ग्राहकांना परवडणारी आहे.

अजय विश्वकर्मा यांनी अभियांत्रिकी पदविका संपादन केली असून त्यांना नवनवीन संशोधनाची आवड आहे. यापूर्वी त्यांनी चोरांपासून सुरक्षितता मिळविण्यासाठी उपकरण तयार केले. कोविडमध्ये निर्जंतुकीकरण उपकरण तसेच मोबाईल पाण्यात पडला तरी त्याचे संरक्षण करण्यासाठी लिक्विड शोधून काढले. त्यांचे सातत्यपूर्ण संशोधन सुरू असून आणखी काही उत्पादनाचे त्यांना पेटंट मिळवायचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: राजगड सहलीवर काळाचा घाला! पाबे घाटात ट्रॅव्हल बस ४० फूट दरीत; दोन ठार, 19 जण जखमी..

Vaibhav Sooryavanshi: भारत हरला तरी वैभवला खेळवू नका! माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Bride Theft Case : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू भावोजीसोबत फरार, पोलीस तपासात खळबळजनक सत्य उघड; पतीसह कुटुंबाला मोठा धक्का !

Samruddhi Road Accident : चिमुरडीचं हसू कायमचं हरपलं! समृद्धी महामार्गावर एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी अंत, थरकाप उडवणारा अपघात

Latest Marathi News Update : नसरापूर प्रकरणात उद्या शिक्षेचा निकाल; दोषी भीमराव कांबळे याला फाशी की जन्मठेप?

SCROLL FOR NEXT