Mangalsutra of corona patients body is stole in Gondia  
विदर्भ

दुर्दैवी! इथे मृत्यूनंतरही होते लूट; कोरोनाबाधित महिलेच्या मृतदेहावरील मंगळसूत्र गायब; पतीची चौकशीची मागणी 

संतोष रोकडे

अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) : मोरगाव येथील कोरोनाबाधित महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे दागिने परत मिळावे म्हणून मृत महिलेच्या पतीने जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षकांकडे लेखी पत्र दिले आहे. यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अर्जुनी मोरगाव पोलिसांना तक्रार घेण्याचे आदेश दिल्याचे समजते.

मोरगाव येथील एका गर्भवती महिलेला १५ ऑक्‍टोबर रोजी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. तिच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी होते. तिची कोरोना रॅपिड ऍन्टीजेन चाचणी करण्यात आली. त्यात ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. तिला पुढील उपचारासाठी गोंदियाला रेफर करण्यात आले होते. मात्र, तिचा मृत्यू झाला. मृत्यूपश्‍चात आणखी कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातदेखील तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

दरम्यान, कोरोनाबाधित असल्याची खात्री झाल्यानंतर प्रशासनाने अंत्यसंस्काराची तयारी केली. डॉक्‍टरांनी नगरपंचायत प्रशासनाला कळविले. कर्मचाऱ्यांनी तिचा मृतदेह पॉलिथिनमध्ये गुंडाळला. अधिकाऱ्यांदेखत मृतदेहावर स्थानिक तलावाशेजारी अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी मृताचा पती व नातेवाईकसुद्धा उपस्थित होते. 

काही दिवसांनी मृत महिलेच्या पतीला मंगळसूत्राची आठवण झाली. त्यांनी गुरुवारी (ता. २२) दागिन्यांविषयी नगरपंचायतमध्ये चौकशी केली असता त्यांनी ग्रामीण रुग्णालयात चौकशी करण्यास सांगितले. ग्रामीण रुग्णालयात चौकशी केली असता मृतदेह नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी पॉलिथिनमध्ये गुंडाळल्याचे सांगून परत पाठविले.

 मंगळसूत्र गेले कुठे, असा प्रश्‍न करून मृत महिलेच्या पतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे लेखी पत्र दिले आहे. या पत्रानुसार, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अर्जुनी मोरगाव पोलिसांना तक्रार घेण्याचे आदेश दिले असल्याचे समजते.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fire News: तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

Plane Service : मोठी बातमी! सोलापूर ते मुंबई विमानसेवा सप्टेंबरपासून होणार सुरू; 'डीजीसीए'कडून स्टार एअरला परवानगी

Rekha Gupta Announcement: 'जनसुनावणी'वेळी झालेल्या हल्ल्यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Ajinkya Rahane नंतर कोण होणार मुंबईचा कर्णधार? श्रेयससोबत शर्यतीत ३३ वर्षीय खेळाडू; MCA कडे आहेत 'हे' तीन पर्याय

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT