maoist got active in telangana border of chandrapur 
विदर्भ

स्वतःच्या स्वार्थासाठी माओवादी घेऊ शकतात मजुरांच्या असंतोषाचा फायदा...

प्रमोद काकडे

चंद्रपूर : तीन दशकांपूर्वी नक्षल कारवायांनी होरपळून निघालेल्या तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील जिवती तालुक्यात पुन्हा नक्षलवादी सक्रीय झाल्याची माहिती आहे. टाळेबंदीत मजूर, शेतकरी यांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. व्यवस्थेविरोधात त्यांच्या मनात रोष आहे. याच असंतोषाला फुंकर घालण्याचे काम नक्षलवाद्यांकडून होवू शकते, अशी पोलिसांना भीती आहे. दोन्ही राज्याच्या पोलिसांनी सीमावर्ती भागात अचानक बंदोबस्त वाढविला आहे. काही 'मोस्ट वॉटेंड' नक्षलवाद्यांची छायाचित्रे सीमावर्ती भागातील गावांमध्ये लावली असून, गावक-यांना सर्तक राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राजुरा विधानसभा क्षेत्रातील जिवती तालुका तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवर वसला आहे. अत्यंत मागास या तालुक्यात आदीम जमातीचे प्राबल्य आहे. वीस वर्षापूर्वी या परिसरात नक्षलवादी सक्रीय होते. अनेक हिंसक कारवाया या भागात झाल्यात. जिवती तालुक्यातील कुंभेझरी आणि दमपूर मोहदा येथे दोन नागरिकांना पोलिसांचे हस्तक समजून नक्षलवाद्यांनी गोळ्या घातल्या होत्या. वणी या गावात बस जाळली. मारईपाटण -भारी रस्त्यावर सुरूंग स्फोट घडविला. यात अकरा पोलिस शहीद झाले. माकोडी पोलिस ठाण्याला आग लावली.

उपाशी नाल्याचे बांधकाम सुरू असताना तीन अभियंत्यांचे नक्षल्यांनी अपहरण केले. राजुरा तालुक्यातील विरूर पोलिस ठाण्यावर गोळीबार केला. ऐंशी-नव्वदच्या सुरवातीच्या दशकातील या घटना. नक्षली हिंसेने हा परिसर तेव्हा रक्तबंबाळ झाला होता. अनेकांनी आपली शेती, घरदार सोडून पलायन केले. त्यानंतर हळहळू हा परिसर शांत होत गेला. लगतच्या राज्यात हिंसक कारवाया केल्यानंतर जिवती तालुक्याचा वापर नक्षली रेस्ट झोन म्हणून करतात, अशी चर्चा फक्त होती.

या काळात हिंसक कारवाया झाल्या नाही. मात्र शासकीय दस्ताऐवजात राजुरा मतदार संघाची अद्यापही नक्षलग्रस्त अशीच ओळख आहे. मागील एक महिन्यांपासून दोन्ही राज्यातील पोलिसांचा बंदोबस्त सीमावर्ती भागात अचानक वाढला. त्यामुळे नक्षलवादी सक्रीय झाल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली. नक्षलवाद्यांच्या हालचाली या भागात आहे, याला एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला.

घनदाट जंगल आणि डोंगर, द-यात वसलेल्या छोट-छोट्या गुड्यांमध्ये आदिम कुटुंबे राहतात. शेतमजुरी हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन. उन्हाळ्यात मोहङ्कुल आणि तेंदूपत्ता तोडतात. तरूण मुले गत काही वर्षांपासून दुस-या राज्यात कामासाठी जात आहेत. मात्र, टाळेबंदीमुळे त्यांच्या हातचे काम गेले. अनेक हालअपेष्टा सहन करत ते घरी पोहोचले. उन्हळ्यातील मोहङ्कुले आणि तेंदूपत्त्याचा रोजगारही कोरोनाने हिरावला. कुटुंबाची किमान गरजही भागत नाही, अशी परिस्थिती आहे. यातूनच व्यवस्थेविषयी त्यांच्या मनात रोष आहे.

त्याचाच फायदा घेत युवकांना गळी लावण्यासाठी नक्षली सक्रीय झाल्याचा तर्क पोलिस यंत्रणेचा आहे. या पाश्र्वभूमीवर सीमावर्ती भागातील दोन्ही राज्यातील गावांमध्ये मोस्ट वाँटेड नक्षल्यांची भित्तीपत्रके लावण्यात आली आहे. यातील कोणतीही व्यक्ती आपल्या भागात आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. पंधरा दिवसांपूर्वी तेलंगणातील वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी मुकदमगुडा येथे भेट दिली. सोबतच तेलंगणातील जैनूर मंडळ, सिरपूर मंडळ, नारनूर मंडळ आणि केरामेरी मंडळ या अंतर्गत येणा-या सर्वच गावांना भेटी देवून नागरिकांना सर्तक राहण्याच्या सूचना केल्या. आता तेलंगणाचे पोलिस दुचाकीवर सीमावर्ती भागात गस्त घालत आहे.

चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कामदगुडा येथे नुकतीच भेट दिली. त्यानंतर चंद्रपूर पोलिसांनीही बंदोबस्त वाढविला आहे. स्थानिक गुन्हे शाखेतील तब्बल ३१ पोलिस कर्मचाèयांना जिवती तालुक्यातील दोन पोलिस ठाणे आणि चार पोलिस उपकेंद्रात हलविण्यात आले. दुसरीकडे एका पोलिस तुकडीचे विशेष प्रशिक्षणसुद्धा चंद्रपुरात सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT