नागपूर : रा. बा. कुंभारे पुतळ्यासमोर हलबा क्रांती सेनेतर्फे अनिश्‍चित काळासाठी सुरू असलेल्या उपोषण मंडपाला भेट देऊन त्यांना मार्गदर्शन करताना ऍड. श्रीहरी अणे.
नागपूर : रा. बा. कुंभारे पुतळ्यासमोर हलबा क्रांती सेनेतर्फे अनिश्‍चित काळासाठी सुरू असलेल्या उपोषण मंडपाला भेट देऊन त्यांना मार्गदर्शन करताना ऍड. श्रीहरी अणे.  
विदर्भ

मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही

सकाळवृत्तसेवा

मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही
नागपूर : हलबा समाज जंगलात राहणारा मूळ आदिवासी आहे. त्यांच्याकडे 1950 पूर्वीचे दाखले कुठून येणार? असा सवाल करून राज्याचे माजी महाधिवक्ता तसेच विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संस्थापक अध्यक्ष ऍड. श्रीहरी अणे यांनी आपल लवकरच या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही असेही सांगितले.
आरक्षणासाठी हलबा क्रांती सेनेतर्फे अनिश्‍चित काळासाठी आंदोलन सुरू केले आहे. अणे यांनी आज आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हलबा समाजाला 1974 नुसार जातप्रमाणपत्रांचे दाखले द्यावे, अशीही मागणी केली. यावेळी त्यांनी आरक्षणासंदर्भात कायदेशीर माहितीही दिली. हलबा समाजाचा मूळ व्यवसाय विणकामाचा आहे. त्यावरून वैदर्भीय भाषेत त्यांना कोष्टी संबोधणे सुरू झाले. पुढे कोष्टी म्हणून त्यांच्या नावासमोर जातीचा उल्लेख केला जाऊ लागला. कागदोपत्री कोष्टी जातीची नोंद असल्याने हलबा समाजावर अन्याय होत आहे. आरक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. विदर्भात हलबा समाजाची लोकसंख्या मोठी आहे. विदर्भाचे स्वतंत्र राज्य झाल्यास समाजाला मोठ्या प्रमाणात प्रतिधिनित्व मिळू शकले. मात्र, तोपर्यंत वाट बघण्याची गरज नाही. कोष्टी जातीचा उल्लेख असला तरी त्यांना हलबा समाजाप्रमाणे आरक्षणाचा लाभ मिळावा याकरिता आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ. त्यांच्याशी चर्चा करून हलबा आणि कोष्टी एकच असल्याचे पटवून देऊ, असेही आश्‍वासन यावेळी श्रीहरी अणे यांनी हलबा समाजाला दिले. यावेळी राम नेवले, ऍड. मुकेश समर्थ, ऍड. नीरज खांदेवाले, तेजिंदरसिंग रेणू, संदेश सिंगलकर, नगरसेवक प्रवीण भिसीकर, श्रावण खापेकर, मंगलमूर्ती सोनकुसरे, मुकेश मासुरकर, राजू म्हैसबडवे, चंद्रशेखर बटुकले, सुकेश निमजे आदी उपस्थित होते.
"भाजपचे षड्‌यंत्र'
हलबांचे आरक्षण न्यायालयात टिकले नाही. मराठा समाजाला अतिरिक्त आरक्षण देण्याची घोषणा सरकारने केली आहे. याविरोधात कोणीतरी न्यायालयात जाईल आणि मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असेही यावेळी अणे यांनी सांगितले. भाजपने शेतकरी आणि हलबा समाजाला संपविण्याचे षड्‌यंत्र रचले आहे. मराठा आंदोलकांचीही हीच गत होणार आहे. कॉंग्रेसप्रमाणे भाजप सरकारही खोटारडे असल्याची टीकाही यावेळी अणे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT