यवतमाळ : कोरोनाच्या भितीमुळे गर्दी टाळण्यासाठी साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना खिळ बसली असली तरी साहित्यप्रेमींनी ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रम घेणे सुरू ठेवले आहे. या सगळ्या गदारोळात विविध साहित्य संमेलने कशी पार पडणार? असे वाटत असतानाच मराठा सेवा संघप्रणीत जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेद्वारे आयोजित 11 वे मराठा साहित्य संमेलन यावर्षी प्रथमच परिषदेच्या अधिकृत फेसबुक पेजवरून (जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र) ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे ठरविले आहे. हे सम्मेलन 27 ते 29 जून या कालावधीत होणार आहे. यात विविध मान्यवर वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करणार आहे.
संमेलन 27 जून रोजी सायंकाळी 5 वाजता डॉ. सरोजिनी बाबर विचारपीठावरून परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक राणा यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होईल. यावेळी संमेलनाचे उद्घाटनपर मनोगत मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार हे मांडणार आहे. परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. निर्मलाताई पाटील या संमेलनाची भूमिका मांडणार असून पाहुण्यांचे स्वागत करणार आहेत.
दुसरे दिवशी 27 जून रोजी 'नैसर्गिक आपत्तीवर संत वाङमयातून व्यक्त झालेले उद्गार' या विषयावर प्रा. डॉ. छायाताई महाले आणि प्रा. डॉ. रवींद्र बेंबरे हे आपले विचार मांडणार आहे. या सत्राचे अध्यक्ष गंगाधर बनबरे हे असणार आहे. संमेलनाच्या तिसरे दिवशी म्हणजेच 29 जून रोजी 'जागतिक महामारी कोरोनाचा साहित्यिक व सामाजिक चळवळीवरील परिणाम व उपाय' या विषयावर डॉ. मनोज तावडे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. या परीसंवादात डॉ. मंजुश्री पवार व विजय चोरमारे सहभागी होतील.
या संमेलनाचे समारोपीय मार्गदर्शन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. पुरुषोत्तम खेडेकर करणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा साहित्यप्रेमीनी आस्वाद घ्यावा, असे आव्हान परिषदेचे विदर्भ विभाग संघटक दत्ता डोहे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.