विदर्भ

वर्धा : ३४ हजार मातांना मातृ वंदनाचा आधार

रूपेश खैरी

वर्धा : माता व बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी शासनाच्या वतीने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंमलात आणली. यात वर्धा जिल्ह्यात पाच वर्षांत ३४ हजार ७४२ मातांना योजनेचा आधार मिळाला आहे. लाभापोटी १५ कोटी २८ लाख ४० हजार रुपये त्यांच्या खात्यात वळते करण्यात आले आहेत. डीबीटी तत्वावर असलेल्या या योजनेचा लाभ थेट बँक खात्यात जमा होतो.

गर्भवती मातांना या योजनेचा लाभ देताना मिळणाऱ्या रकमेतून सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करणे हा आहे. यातून माताच नाही तर बालकाचे आरोग्य सुदृढ ठेवणे हा या मागचा उद्देश आहे. या माध्यमातून वाढत असलेले मातामृत्यू आणि बालमृत्यूला आळा घालणे शक्य असल्याने हा योजना अंमलात आणल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. या योजनेतून महिलांना लाभ देण्याकरिता शासनाच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.

या योजनेचा लाभ तीन टप्प्यात देण्यात येत आहे. यात पहिला टप्पा गर्भधारणा झाल्यापासून देण्यात येत. पहिला टप्पा एक हजार रुपये, दुसरा टप्पा दोन हजार रुपये आणि तिसरा टप्पा दोन हजार रुपये असे एकूण पाच हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. याचा लाभ घेण्यासाठी महिलांना त्यांचे आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक देणे बंधनकारक आहे.

बालमृत्यू रोखण्याच्या उद्देशाने सप्ताह

शासनाने बालमृत्यू रोखण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत पंतप्रधान मातृवंदना योजनेचा सप्ताह राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वत्र या योजनेवर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे.

तिसऱ्या टप्प्यासाठी आधार गरजेचे

गर्भवती महिलेकडे आधार कार्ड नसल्यास तिला अन्य ओळख पत्राच्या आधारे मदत दिली जाते. पण, तिसऱ्या टप्प्याकरिता मात्र आधार आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

वर्षानिहाय मिळालेला लाभ

वर्ष लाभार्थी वितरीत रक्कम

२०१७-१८ ५,८८३ १ कोटी २ लाख ३५ हजार

२०१८-१९ ७,७२२ ३ कोटी २६ लाख ७७ हजार

२०१९-२० १०,६०४ ५ कोटी ८२ लाख ३७ हजार

२०२०-२१ ७,३०५ ३ कोटी ७६ हजार ८८ हजार (ऑगस्ट महिन्यापर्यंत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT