Fraud Doctor
Fraud Doctor 
विदर्भ

अफलातून..! एमबीबीएस एम.डी. डॉक्‍टर निघाला केवळ बारावी पास 

सकाळ वृत्तसेवा

अमरावती  : गंभीर आजारावर कोणतीही शस्त्रक्रिया न करता रुग्णांना बरे करण्याचा दावा करणारा तोतया एम.बी.बी.एस., एम.डी. डॉ. अविनाश वसंत डबले याचे केवळ बारावीपर्यंतच शिक्षण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्याच्या घराची पोलिसांनी रविवारी (ता. पाच) झडती घेतली. या ठिकाणावरून फ्रेजरपुरा पोलिसांनी बनावट दस्तऐवज, शिक्के, ओळखपत्र जप्त केले. 

तोतया डॉ. अविनाश वसंत डबले याने शहरात आधी शांतिनगर बेनोडा व नंतर किरणनगर नं. 2 येथे आठ बेडचे रुग्णालय सुरू केले. त्यापूर्वी अविनाश डबले हा अमरावती, यवतमाळ व नागपूर येथील काही डॉक्‍टरांच्या खासगी रुग्णालयात मदतनीस म्हणून काम करीत होता. त्याने वैद्यकीय क्षेत्रातील बारकावे मोठ्या प्रमाणात समजावून घेतले. या व्यवसायात येणारा पैसा त्याच्या डोळ्यांपुढे दिसू लागला. अन्‌ त्याने स्वत:च डॉक्‍टर म्हणून पुढे येण्याचे ठरविले. त्यासाठी नागपूर वैद्यकीय महाविद्यालयातून 2004 साली एमबीबीएस, एम.डी.पर्यंत शिक्षण पूर्ण करून पदवी प्राप्त केल्याचे सांगितले.

शिवाय सीएमई फाउंडेशन मुंबई येथील सदस्य असल्याचे ओळखपत्रही त्याच्या भवते ले-आउट परिसरातील घरात पोलिसांना आढळले. ते पोलिसांनी रविवारी (ता. पाच) जप्त केले. आधी शांतिनगर बेनोडा येथे एक वर्षापेक्षा अधिक काळपर्यंत रुग्णालय चालविले. तेथे डबले याने त्याच्या रुग्णालयात रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, थायरॉईड, अस्थमा, अर्धांगवायू, क्षयरोगावर उपचार केले जात असल्याचे मोठ्या फलकावर नमूद केले होते. हे उपचार त्याने एकाही रुग्णावर शस्त्रकिया न करताच केल्याचा दावा केला. तो मंगळवारपर्यंत फ्रेजरपुरा पोलिसांच्या कोठडीत आहे. 

रुग्णालयात काम करणाऱ्यांची चौकशी 

तोतया एम.डी. डॉक्‍टरच्या रुग्णालयात दोन परिचारिका तर एक युवक मदतनीस म्हणून कामाला होते. त्या तिघांचे बयाण नोंदविण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. 

पोलिसांना जिल्हाशल्य चिकित्सकांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. प्रकरण गंभीर असल्यामुळे त्याचा सखोल तपास केला जाईल. 
- बालाजी लालपालवाले, पोलिस उपनिरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT