Meat is selling in weekly market in karanja wardha  
विदर्भ

कारंजाच्या आठवडी बाजारात उघड्यावर मांस विक्री; नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात 

गजानन बाजारे

कारंजा (घाडगे, जि. वर्धा) : शहराच्या मध्यभागी पाण्याच्या टाकीखाली आठवडी बाजाराचे दिवशी उघड्यावर मांस सुरू असते. कोरोनाचे काळातही निर्धास्तपणे सुरू असलेल्या या मांसविक्रीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. 

यामुळे जनतेने आरोग्य लक्षात घेऊन उघड्यावर होणारी ही विक्री थांबवावी अशी लेखी तक्रार प्रभाग क्रमांक 12 येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण मुत्तेवार आणि परिसरातील नागरिकांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांच्याकडे दिली आहे.

शहरात मांसविक्रीसाठी बसस्थानकाशेजारी जागा नेमून दिली आहे. या दुकानात सहा दिवस मटन विक्री होते. परंतु, आठवडी बाजाराच्या दिवशी गावाच्या मध्यभागी असलेल्या पाण्याच्या टाकीखाली वस्तीला लागून उघड्यावर दुकाने लावल्या जतात. यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होऊन जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

यामुळे रोगराई वाढण्याची दाट शक्‍यता आहे. पाण्याच्या टाकीखाली हा सगळा प्रकार होत आहे. यामुळे बाजाराच्या दिवशीसुद्धा इतरदिवसाप्रमाणे रविवारला नगरपंचायतने नेमून दिलेल्या जागेवर बसस्थानकाबाजूला दुकाने लावावी, स्वच्छता राखावी अशी जनतेची मागणी आहे. गावकऱ्यांच्या आरोग्याचे हित लक्षात घेत नगरपंचायतने याबाबत कार्यवाही करून दुसऱ्या सोयीचे ठिकाणी बंद शेड बांधून तिथे मांस विक्री करण्याची तरतूद करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT