A meeting was called by the Speaker of the Assembly on the issue of cotton seeds 
विदर्भ

कापूस बियाण्यांचा मुद्दा विधानभवनात; अध्यक्ष नाना पटोलेंनी गुरुवारी बोलावली बैठक

सूरज पाटील

यवतमाळ : राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्या शेतकऱ्यांना भरघोस उत्पादनाचे स्वप्न दाखवीत आहे. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांपासून कापसावर बोंडअळीसह अनेक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यानंतरही कंपन्या शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत असल्याचे निवेदन किसान कॉंग्रेसचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना दिले होते. त्याअनुषंगाने विधानसभा अध्यक्षांनी गुरुवारी (ता. १७) विधानभवन येथे कापूस बियाण्यांसंदर्भात बैठक आयोजित केली आहे.

देशी सरळ व संकरित वाणांच्या कपाशीचे पारंपरिक पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना कंपन्यांनी जनुकीय तंत्रज्ञानाद्वारे निर्माण केलेल्या बियाण्यांतून भरघोस उत्पादनाचे स्वप्न दाखविले. या तंत्रज्ञानाचे बियाणे हे रोगप्रतिकार क्षमतेचे, बोंडअळी प्रतिरोधक, कमीखर्चिक व अधिक उत्पन्न देणारे असल्याचे दावे कंपन्यांचे आहेत. परंतु, बीटी कापूस बियाण्यांसंदर्भात कंपन्यांनी केलेले दावे खोटे ठरले आहेत.

तीन ते चार वर्षांपासून कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक प्रकारच्या किडींनी पिकांना मोठी हानी पोहोचविली आहेत. त्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढल्याने शेतकरी कोलमडून पडले असल्याचे निवेदन देवानंद पवार व डॉ. संजय लाखे पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना दिले होते. या निवेदनावर विधानसभा अध्यक्षांनी बैठक बोलविली आहे. 

कृषिमंत्र्यांसह अनेकांना दिले निमंत्रण

बैठकीला कृषिमंत्री, कृषी राज्यमंत्री, कृषी विभागाचे सचिव, आयुक्त, सर्व कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, मुख्य कापूस संशोधक, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे संचालक, सेट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्चचे संचालक, डॉ. शरद निंबाळकर, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी विजय जावंधिया, देवानंद पवार, संजय लाखे पाटील, अमृत देशमुख आदींना बोलविण्यात आले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT