megha dujjuka 
विदर्भ

वयाच्या 24 व्या वर्षी मेघा बनली न्यायाधीश

अविनाश बेलाडकर

मूर्तिजापूर (जि.अकोला) : स्थानिक ॲड. मेघा दीपक दज्जुका दिवाणी न्यायधीश (कनिष्ठ स्तर) 2019 परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणारी तालुक्यामधून अग्रवाल समाजाची पहिली मुलगी आहे. वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी महिला न्यायाधीश होण्याचा मान मेघाने पटकावला आहे. त्यामुळे तालुक्यामधून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केल्या जात आहे.

सेंट ॲन्स स्कूलमधून दहावीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या मेघाने बारावीचे शिक्षण गाडगे महारज विज्ञान महाविद्यायामधून पूर्ण केले. विज्ञान विषय घेऊन मेघाने कुठलीही शिकवणी वर्ग न लावता ‘सेल्फ स्टडी’ ला प्राधान्य दिले. आणि बारावीला 52 टक्के घेऊन यश संपादन केले. त्यानंतर जळगावच्या एस. एस. मणियार ‘लॉ’ कॉलेजमधून 5 वर्षाचे शिक्षण घेतले. लॉ चा चौथ्या वर्षी मेघाने पुणे येथील नॅशनल ग्रीन ट्री बुनल यांचा वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावुन तीन हजार रुपयाचे रोख बक्षीस सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. खानविलकर यांच्या हस्ते देण्यात आले.

विधीच्या शेवटच्या वर्षी गोल्ड मेडल
विधीच्या शेवटच्या वर्षी मेघाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामधून प्रथम मेरिट आणि प्रथम श्रेणीत तिने गोल्ड मेडल पटकावले. 2018 साली मेघाने विधीचे शिक्षण पूर्ण  केले. त्यानंतर लगेच तिने दिवाणी न्यायाधीश परीक्षेची तयारी सुरू केली. परीक्षेची तयारी चालू असताना मूर्तिजापूर न्यायालयात वकिली सुद्धा चालू केली. दिवाणी न्यायाधीश परीक्षेचे वेड असलेल्या मेघाने मागील सर्व परीक्षेचे पेपर जमा करून अभ्यास केला. यासाठी मेघाला प्राध्यापक गणेश सिरसाट यांचे सहकार्य मिळाले. मुख्य परीक्षा व त्यानंतर मुलाखतीसाठी प्रा. सिरसाट यांच्याकडे मेघाने तयारी चालू केली.

आई-वडील होते पाठिमागे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या जे. एम. एफ. सी. परीक्षेचा निकाल (ता.21) जाहीर झाला आणि चांगले गुण घेऊन मेघा महाराष्ट्रातून 84 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. वयाचा 24 व्या वर्षी न्यायाधीश होण्याचा मान पटकावला. मूर्तिजापूर वासियांना ही बातमी मिळताच चोहिकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मेघा आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना देते. आई-वडील खंबिरपणे पाठीमागे उभे असल्यामुळे आपण शिक्षण पूर्ण करू शकल्याचे मेघाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT