message came to loan waiver but name not display in list  
विदर्भ

'कर्जमाफीचे मेसेज तर आले, पण यादीत नावच नाही; सांगा आम्ही करायचं काय?'

राजेश काळे

यवतमाळ : महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी घोषित करण्यात आली. राळेगावातील काही शेतकऱ्यांना त्यांचे नाव आधार प्रमाणीकरणाच्या यादीत प्रसिद्ध झाल्याचे मेसेजही आले. पण, प्रत्यक्षात मात्र यादीत नावच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आपले नाव आधार प्रमाणीकरणाच्या यादीत प्रसिद्ध झाले आहे. यादीतील नमूद विशिष्ट क्रमांक आधार कार्ड व बचत खाते पासबुक घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्राच्या बँक शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण तातडीने करावे, जेणेकरून तुम्हाला कर्जमाफीचा लाभ देता येईल, असे मेसेज शेतकऱ्यांना १६ सप्टेंबरपासून येत आहेत. त्यानंतर शेतकरी आपले सेवा केंद्रात, बँकेत व सहाय्यक निबंधक कार्यालयात गेले. परंतु, तीनही ठिकाणी त्यांचे नाव त्यांना यादीत मिळाले नाही. यापूर्वी कर्जमाफीचा मेसेज आला की, शेतकऱ्यांचे नाव यादीत तत्काळ यायचे. मेसेज येणे व नाव यादीत येणे, या दोन्ही प्रक्रिया सारख्याच व्हायच्या. परंतु, यंदा मेसेज येऊनही सहा दिवस होऊन शेतकऱ्यांचे नाव यादीत आले नाही. 

याबाबत सहाय्यक निबंधक कार्यालयाशी संपर्क साधला असता, नाव मागेपुढे येऊ शकते. परंतु, मेसेज आला म्हणजे शंभर टक्‍के कर्जमाफी झाली, असे कार्यालयाचे म्हणणे आहे. बँकही असेच उत्तर देते. यादीत नाव न आल्याने कदाचित फेक मेसेज तर आपल्याला आला नसावा, अशाही शंका शेतकऱ्यांच्या मनात येत आहेत. एकतर संबंधित सहकार विभागाने कर्जमाफीची यादी तत्काळ अद्यावत करावी किंवा याबाबत समोर येऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

Karad Chain Snatching: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर ‘जॅक’ पडला भारी; कऱ्हाडमध्ये उसातून शोधला सोनसाखळी चोर, श्वानाने काढला माग

SCROLL FOR NEXT