Macchardani 
विदर्भ

ना डासांचा त्रास, ना गर्मी; भंडाऱ्याच्या युवा शास्त्रज्ञाने बनविली एअरकुल्ड मच्छरदाणी! 

मिथिलेश गिऱ्हेपुंजे

लाखनी (जि. भंडारा) : भंडारा जिल्ह्यातील मूळचे लाखनी येथील निवासी असलेले डॉ. शिरीष खेडीकर हे सध्या पुणे येथे भारतीय हवामानशास्त्र विभागात शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या विशेष संशोधनातून डास आणि उच्च तापमानापासून बचाव करणाऱ्या एअरकुल्ड मच्छरदाणीची निर्मिती केली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निवारागृहात क्वारंटाइन केलेल्या व्यक्तींचा डास व उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी ही मच्छरदाणी "सुरक्षा कवच' म्हणून उपयुक्त ठरणार आहे. 

कोरोना संसर्गाच्या वातावरणामुळे कोविड पॉझिटिव्ह व्यक्तींना आणि संशयितांना विलगीकरण आणि क्वारंटाइनमध्ये ठेवले जाते. अनेक राज्यांतील स्थलांतरित मजूर आणि नागरिक वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले. या सर्व लोकांना शक्‍य त्या सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. शासनाने अनेक ठिकाणी लोकांच्या निवासाची तात्पुरती सोय केली आहे. परंतु, प्रत्येक व्यक्तीच्या सर्वच गरजांची पूर्तता करणे सरकारलाही शक्‍य नाही. सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. अनेक भागात डासांचाही प्रादुर्भाव आहे. अशा परिस्थितीत अत्यंत कमी खर्चात तयार होणारी ही बहुपयोगी मच्छरदाणी त्यांच्याकरिता "सुरक्षा कवचा'चे काम करू शकेल. 

खर्चात बचत व सुरक्षा 

कोरोनासंदर्भात उपाययोजना सुचविताना शक्‍यतोवर वातानुकूल आणि कूलिंग सिस्टमचा वापर कमी करा किंवा टाळावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्यात काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित होणे आणि भारनियमनाची समस्या आहे. क्वारंटाइन आणि आयसोलेशन दरम्यान प्रत्येक व्यक्तीसाठी पंखा किंवा एअर कूलर उपलब्ध करणे सरकारला शक्‍य नाही. रात्रीच्या वेळी डासांचा प्रादुर्भाव होत असल्याने मलेरिया, डेंगी, चिकुनगुनिया सारख्या कीटकजन्य आजारांच्या संसर्गाचा धोका असतो. तथापि, डास पळविण्यासाठी होणाऱ्या तात्पुरत्या मॉस्किटो क्वाईल, द्रवरूप रिफिल अशा उपाययोजनांवर बराच खर्च येतो. त्याचे अनेक दुष्परिणामसुद्धा होतात. जागतिक आरोग्य संघटना सुद्धा मच्छरदाणी वापरण्याचा सल्ला देते. 

मच्छरदाणी नव्हे सुरक्षा कवच.... 

उपकरण वापरण्यासाठी जाळीला जोडलेल्या पिशवीत पाणी भरले जाते. पाणी जाळ्याद्वारे शोषले जाऊन तापमान आणि हवेमुळे पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने आतील तापमान कमी होते. हे उपकरण जाळीच्या आतील तापमान 4 ते 8 डिग्री सेल्सियसने कमी करू शकते. डॉ. खेडीकर यांनी या सूक्ष्म हवामान नियंत्रक मच्छरदाणीचा शोध लावला असून नुकतेच त्याचे पेटंट देखील फाईल केले आहे. मार्च महिन्यात त्यांनी एकाच वेळी 10 पेटंट्‌स फाईल करून विश्‍वविक्रम केला आहे. उत्पादनाची किंमत प्रति युनिट 500 ते 700 रुपये असून ही आधुनिक मच्छरदाणी 3 ते 4 वर्षे सहज वापरता येते. वापरताना कोणत्याही देखभाल व दुरुस्तीच्या खर्चाची आवश्‍यकता नाही. ही मच्छरदाणी पोर्टेबल आहे. धुण्यायोग्य आणि वापरण्यास सुलभ असून पर्यावरणास अनुकूल आहे. मच्छरदाणी तयार करणे अगदी सोपे आहे. तयार करण्याचे साहित्य देखील सहज उपलब्ध होते. 

मच्छरदाणीच्या निर्मितीतून अनेक गरजू महिला आणि बेरोजगारांना काम मिळून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होऊ शकेल. हे उपकरण जंगलात, बाहेरगावी आणि अशा ठिकाणी वापरले जाऊ शकते जेथे वीज किंवा लोडशेडिंगची समस्या आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात हे उपकरण निश्‍चितच उपयुक्त ठरू शकेल. म्हणूनच जनतेच्या मदतीसाठी हे तंत्रज्ञान आपण शासनाला देण्यास तयार आहोत. 

शोधकर्ता : डॉ. शिरीष खेडीकर, 
शास्त्रज्ञ, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे. 
भ्रमणध्वनी क्रमांक- 9423403552 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT