Nagraj-and-Amitabh
Nagraj-and-Amitabh 
विदर्भ

#MeToo ‘झुंड’च्या चित्रीकरणावर ‘मी टू’ चे सावट

सकाळवृत्तसेवा

नागपूर - सध्या देशभर चर्चिल्या जात असलेल्या ‘मी टू’ चळवळीचा फटका आता ‘झुंड’ या हिंदी चित्रपटालाही बसण्याची दाट शक्‍यता आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे नाव ‘मी टू’मध्ये आल्याने, त्यांची चित्रपटातून हकालपट्टी होण्याची चिन्हे दिसत आहे. ते चित्रपटातून बाहेर पडल्यास पुढील महिन्यात नागपुरात होऊ घातलेले चित्रीकरण लांबणीवर पडू शकते.

नागपूरचे फुटबॉल प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित ‘झुंड’ चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिका साकारणार आहेत. टी-सीरिजचे भूषणकुमार चित्रपटाचे निर्माते असून, सैराट फेम नागराज दिग्दर्शन करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मी टू चळवळीत मंजुळे यांचे नाव पुढे आल्यामुळे भूषणकुमार त्यांना चित्रपटातून बाहेर करण्याची शक्‍यता आहे. काही वर्षांपूर्वी ‘मोगुल’ चित्रपटाच्या वेळी दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यावर अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर भूषणकुमार यांनी कपूर यांना बाहेर केले होते. त्यामुळे मंजुळेंच्या बाबतीतही ते असाच निर्णय घेऊ शकतात, अशी चर्चा आहे. तसे झाल्यास ‘झुंड’ चित्रपटाचे चित्रीकरण पुन्हा वांध्यात येणार आहे.

गतवर्षी पुणे येथील चित्रीकरणही निर्मात्यांच्या आपापसातील भांडणामुळे रद्द करण्यात आले होते. त्यावेळी चित्रीकरणासाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठात भव्य सेट उभारण्यात आला होता, हे उल्लेखनीय. त्यानंतर चित्रीकरण नागपुरात करण्याचा निर्णय घेण्यात आला. ४५ दिवसांचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. चित्रीकरणासाठी मोहननगर येथील सेंट जॉन्स हायस्कूल, लोणारा येथील क्रीडा विकास संस्थेचे मैदान,  पारशिवनी तालुक्‍यातील कोलितमारा या आदिवासी गावासह अनेक ‘लोकेशन्स’ची निवड करण्यात आल्याची चर्चा आहे. या निमित्ताने ‘बिग बीं’चा नागपुरात दीर्घ मुक्‍काम राहणार असल्याने, या चित्रपटाबद्दल सिनेमाप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.

‘झुंड’ चित्रपटातून दिग्दर्शक नागराज मंजुळे हे बाहेर पडणार असल्याच्या चर्चेबद्दल माझ्याकडे कसलीही माहिती नाही. शिवाय चित्रीकरण केव्हा आणि कुठे होणार, याबद्दलही मी अनभिज्ञ आहे. त्यामुळे मी काहीच बोलू शकत नाही. यासंदर्भात माझे कुणाशी बोलणेदेखील झाले नाही.
- प्रा. विजय बारसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT