Migration is going from Melghat as there are no jobs  
विदर्भ

मेळघाटवर स्थलांतराचे काळे ढग; स्थानिक स्तरावर रोजगाराचा अभाव

सुधीर भारती

अमरावती ः दिवाळी संपताना आता मेळघाटात मजुरांच्या स्थलांतराची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे स्थलांतर केल्यामुळे कुटुंबातील चिमुकल्या मुलामुलींना पोषणाहारसुद्धा उपलब्ध होत नाही. त्यामुळे दरवर्षी कुपोषणाची आकडेवारी वाढत जाते.

येथील मजूर मराठवाड्यासह चेन्नई, बंगळूर, कर्नाटक आदी राज्यांमध्ये कामासाठी जात असतात. कोरोना लॉकडाउनपुर्वीसुद्धा मेळघाटातील मजुरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले होते. मार्चपासून लॉकडाउन सुरू झाल्याने स्थानिक आदिवासी गावातच राहिले. मात्र आता आदिवासीबांधवांची पाच दिवसांची दिवाळी संपताच अनेक कुटुंबांनी स्थलांतराची तयारी सुरू केली आहे. 

मागील वर्षी मेळघाटातील धारणी तसेच चिखलदरा तालुक्‍यातील बहुतांश गावे रिकामी झाली होती. यावर्षीसुद्धा आता दिवाळीनंतर स्थलांतराला वेग येणार आहे. मेळघाटात अद्यापही मजुरांना स्थानिक स्तरावर कामे उपलब्ध करून देण्यास सरकारी यंत्रणा सक्षम झालेली नाही. शासनाच्या बहुतांश योजनांचा लाभ त्याच्यापर्यंत पोहोचत नसल्याची ओरड सुरू आहे. अशा परिस्थितीत आता कामासाठी मेळघाटात स्थलांतराचे वारे वाहू लागले आहे.

वीटाभट्ट्यांवर काम

दरवर्षी मेळघाटातून हजारो कुटुंबे रोजगारासाठी अन्य जिल्ह्यात तसेच परप्रांतात जात असतात. त्यांच्यासोबत चिमुकली मुलेसुद्धा जातात. पर्यायाने अंगणवाड्यांमधूून मिळणारा पोषणाहार बंद होतो. बहुतांश मजूर हे वीट भट्ट्यांवर आपल्या कुटुंबासह काम करतात. त्यामुळे कुपोषणात वाढ होण्याची शक्‍यता आहे.\

शासनाने मेळघाटातच स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. रोजगार हमीची कामे त्वरित सुरू करून रोजगार देण्याची गरज आहे. तरच मजुरांचे स्थलांतर रोखले जाऊ शकते.
-ऍड. बंडू साने, 
खोज संस्थापक.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kirloskar Company Kundal : कुंडलमधील किर्लोस्कर कंपनी अन् गावकऱ्यांचा रस्त्यावरून वाद; थेट माजी आमदारांनी केलं ५ तास ठिय्या आंदोलन, नेमक काय प्रकरण?

फक्त १५४ रुपयात २ बीएचके! चिनी माणसाने लिलावात जिंकला ७३२ चौरस फुटाचा फ्लॅट

HDFC Bank MCLR Hike : एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना मोठा धक्का! MCLR दरात १५ बेसिस पॉइंट्सची वाढ; गृहकर्जासह इतर कर्जांचे ईएमआय महागणार?

Latest Marathi News Live Update : सोनिया गांधींवरील बायोपिकमध्ये सत्य मांडले जाणे आवश्यक, राम कदम यांनी व्यक्त केली अपेक्षा

IPL 2027 Trade : दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात भलतंच घडतंय! Axar Patel, रिषभ पंत यांनी हात वर केले; लोकेश राहुलने दिला नकार, आता...

SCROLL FOR NEXT