file photo 
विदर्भ

लाखो क्विंटल धानखरेदी; शेतकऱ्यांचे चुकारे शासनाकडे थकीत

सकाळ वृत्तसेवा

भंडारा : जिल्ह्यात 84 केंद्रावर नोव्हेंबर महिन्यापासून आधारभूत धान खरेदी करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 21 लाख 12 हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. त्याची आधारभूत दराने किंमत 383 कोटी 44 लाख रुपये आहे. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना वाढीव दर आणि बोनसनुसार चुकारे दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये शासनाकडे थकीत आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात सर्वसाधारण ग्रेडचा 20 लाख 66 हजार 961 क्विंटल आणि अ ग्रेडचा 45 हजार 192 क्विंटल धान खरेदी झाली आहे. या धानाची किंमत आधारभूत किंमती 1815 प्रमाणे 383 कोटी 44 लाख 63 हजार 623 रुपये आहे. आतापर्यंत 270 कोटी 48 लाख 70 हजार 199 रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. 112 कोटी 95 लाख 93 हजार 423 रुपयांचे चुकारे बाकी आहेत.

शेतकऱ्यांना अस्मानी संकटाचा सामना

शासनाने धानाला आधारभूत किंमत 1815 रुपये घोषित केली. त्यानंतर धानाला प्रतिक्विंटल 500 रुपये बोनस आणि 200 रुपये प्रोत्साहन असे 700 वाढीव दर दिले होते. याबाबत घोषणाही करण्यात आली होती. मात्र भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत खरेदी केलेल्या धानाचे चुकारे आधारभूत किमतीनुसारच करण्यात आले. आधारभूत किमतीचीच 112 कोटी 95 लाखांचे चुकाने थकीत आहेत. त्यात 700 रुपये वाढीव दराची वाढ केल्यास हा आकडा कोट्यवधींच्या घरात जातो. परंतु, आतापर्यंत शेतकऱ्यांना वाढीव दरानुसार चुकारेच करण्यात आले नाही. आधीच जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी संकटाचा सामना करीत आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे.

विक्रीसाठीही शेतकऱ्यांना प्रतीक्षा

आसगाव, लाखांदूर येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी आपला धान आणला आहे. 30 मार्चपासून धान खरेदी बंद होणार आहे.परंतु, गोदाम तुडूंब भरले असल्याने धानखरेदी ठप्प पडली आहे. गोदामातील धान भरडाईचे आदेश मिळालेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून खरेदी बंद आहे. परंतु, कुठे टोकनधारक शेतकऱ्यांना डावलून खासगी व्यापाऱ्यांचाच माल खरेदी होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.

कोट्यवधी रुपये शासनाकडे थकीत

साकोली तालुक्‍यातील पिंपळगाव येथील शेतकऱ्यांचे धानखरेदी केंद्राकडून दोन कोटी रुपये थकित आहेत. तसेच साकोलीत 50 लाख रुपये बाकी आहेत. यावर्षी शासनाकडून जाहीर केलेल्या बोनसमुळे शेतकऱ्यांना बाजारात धानविक्री परवडत नाही. त्यामुळे शेतकरी हमीभाव धान खरेदी केंद्रातच विक्रीचा प्रयत्न करत आहेत. त्यातही खासगी व्यापाऱ्यांचा त्रास असल्याने आपले धान विकले जाईल किंवा नाही? असा प्रश्‍न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US Proposal: इराणची मोठी हालचाल! अमेरिकेला नवा १४ कलमी अणुकराराचा प्रस्ताव पाठवला, कोणत्या अटी ठेवल्या?

बीसीसीआयला RTI कायद्यातून वगळले! CIC चा महत्त्वाचा निर्णय; कारण काय दिले ते वाचा...

ट्रकचा अक्षरशः चेंदामेंदा! १०० वऱ्हाड्यांना घेऊन जाणारा ट्रक पलटी, १२ जणांचा मृत्यू, घटनास्थळावरील थरारक व्हिडिओ समोर

Iran War Preparation : इराण झुकण्यास तयार नाही! ट्रम्प यांच्या धमकीनंतर इस्लामी सरकारचा मोठा निर्णय? लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्याच हाती दिली AK-47

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यचा जामीन फेटाळला

SCROLL FOR NEXT