Murder
Murder Sakal
विदर्भ

वर्धा : खून करून मृतदेह पुरला खड्‌ड्यात

सकाळ वृत्तसेवा

पवनार (जि. वर्धा) - गत पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १४ वर्षीय मुलीचा गळा आवळून खून केला. ही धक्कादायक घटना पवनार येथे बुधवारी (ता. २०) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. रितीका काखे असे मृत मुलीचे नाव आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याने हत्येची कबुली दिली. हत्येनंतर आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पुरल्याचे उघड झाले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश जोगे (वय ३०, रा. पवनार) असे याला ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतल्यानंतर तब्बल पाच तासांनी त्याने रितीकाचा खून केल्याची कबुली दिली. अल्पवयीन मुलगी ही शनिवारपासून बेपत्ता होती. तिचा सर्वत्र शोध घेतला असता गावालगत असलेल्या नदीत एका झुडपाशेजारी तिचे कपडे पडून असल्याचे आढळून आले. यामुळे तिच्यासोबत अनुचित प्रकार झाला असावा, असा संशय तिच्या आईने व्यक्त करून पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपात करून संशयावरून सतीश जोगे याला ताब्यात घेतले. खुनाची माहिती माळताच घटनास्थळी पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप, सेवाग्रामचे ठाणेदार नीलेश ब्राह्मणे यांच्यासह पोलिस कर्मचारी दाखल झाले.

दुपट्ट्याने आवळला गळा

या प्रकरणात आरोपी सतीशने रितीकाचा सोमवारी (ता. १८) दुपारी ३ वाजताच्या सुमारास दुपट्ट्याने गळा आवळून खून केला. मृतदेह नदीलगतच्या बेशरमच्या झाडाजवळ गड्डा करून पुरला होता. आरोपीने घटनास्थळाची माहिती सेवाग्राम पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढला. मृतदेह पूर्णपने नग्नावस्थेत आणि कुजलेल्या अवस्थेत असल्याने अनुचित प्रकाराचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Latest Marathi News Live Update: मध्य रेल्वेच्या ३० समर स्पेशल ट्रेनला मुदतवाढ

SCROLL FOR NEXT