हिंगणा एमआयडीसी : कुलूपबंद असलेल्या महाराष्ट्र ऍन्टिबायोटिक प्रकल्पाची दैन्यावस्था दाखवणारे चित्र.
हिंगणा एमआयडीसी : कुलूपबंद असलेल्या महाराष्ट्र ऍन्टिबायोटिक प्रकल्पाची दैन्यावस्था दाखवणारे चित्र.  
विदर्भ

महाराष्ट्र ऍन्टिबायोटिक प्रकल्पाचा निधी गहाळ

अजय धर्मपुरीवार

हिंगणा (जि. नागपूर) : एमआयडीसीतील महाराष्ट्र ऍन्टिबायोटिक प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र शासनाकडून 100 कोटीचा निधी देण्यात आला होता. चार वर्षांपूर्वी केंद्र सरकारकडून कार्यक्रमही घेण्यात आला. यानंतर मात्र कामाचा थांगपत्ता नसून केंद्र सरकारचे उद्योग जगताकडे दुर्लक्ष होत असल्याने निधी गहाळ झाल्याची चर्चा सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा एमआयडीसी उद्योगासाठी काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध होती. केंद्र व राज्य शासनाकडून उद्योगांना सुविधा मिळत नसल्याने हिंगणा एमआयडीसीतील 60 टक्‍के उद्योग जवळपास कुलूपबंद झाले आहेत. बंद झालेल्या उद्योगांमध्ये फेकार, बजाज प्लॅस्टिक, राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या मेल्टान, महाराष्ट्र ऍन्टिबायोटिक प्रायव्हेट लिमिटेड यासह इतर 40 लहान कंपन्या जवळपास बंद झाल्या आहेत. यामुळे हजारो कामगारांचा रोजगार हिरावला आहे.चार वर्षांपूर्वी महाराष्ट्र ऍन्टिबायोटिक कंपनीचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी केंद्राकडून 100 कोटीचा निधी मंजूर झाला होता. कंपनीच्या समोरील आवारात मोठ्या थाटामाटात कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील मोठे नेते उपस्थित होते. राज्य शासनाचा बंद पडलेला हा उद्योग सुरू होणार असल्याने पुन्हा रोजगार उपलब्ध होईल, अशा आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र चार वर्षांचा कालावधी लोटूनही या उद्योगाच्या पुनरुज्जीवनासाठी कोणत्याही हालचाली सरकारकडून करण्यात आल्या नाहीत. यामुळे आतातरी या कंपनीच्या उद्धारासाठी दिलेला निधी शोधून द्यावा अशी मागणी केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

SCROLL FOR NEXT