mla akash fundkar in khamgaon.jpeg 
विदर्भ

भाजपच्या आमदाराने केले आवाहन; धावून आले कार्यकर्ते अन् झाले तब्बल ऐवढे रुपये जमा

सकाळ वृत्तसेवा

खामगाव (जि.बुलडाणा) : संपूर्ण जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएम केअरमध्ये मोठ्या प्रमाणात निधी जमा करण्यात येत आहे. यातच बुलडाणा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. आकाश फुंडकर यांच्या सोशल मीडियावरील आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टी बुलडाणा जिल्हाद्वारा एकूण सात लाख रुपये एवढा निधी जमा करण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसच्या लढाईत जनसामान्यांना मदत व्हावी, या दृष्टिकोनातून पीएम केअर स्थापन करण्यात आले आहे. त्यानुसार आमदार तथा भाजप बुलडाणाचे जिल्हाध्यक्ष ॲड.आकाश फुंडकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना पीएम केअरमध्ये ‍निधी जमा करावा, असे आवाहन फेसबुकव्दारे केले असता. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हाभरातील जवळपास चार हजार कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी बुलडाणाच्यावतीने रुपये सात लाख एवढा निधी जमा करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूच्या संकटाच्या काळात सर्व सामान्य जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असताना खामगाव मतदारसंघाचे आमदार ॲड. आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनात नियोजनबध्द पध्दतीने खामगाव मतदारसंघातील गोर गरीब जनतेला भाजप व भाजयुवा मोर्चा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भोजन पाकीटांचे वाटप करीत आहेत. आमदार आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनात भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कोणताही गाजावाजा न करता जनसामान्यांच्या सेवेत कार्यरत आहेत.

५० हजार गोरगरीब गरजूंना भोजन पाकीट वाटप
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे जनसामान्यांना दिलासादायक कार्य सुरू आहे. मागील महिना भरात 50 हजार गोरगरीब गरजूंना भोजन पाकीटचे वाटप आमदार ॲड.आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनात वाटप करण्यात आले आहेत. यासोबतच 24 एप्रिल रोजी बाजार समितीच्यावतीने 11 लाख रुपयांची आर्थिक मदत पीएम केअरसाठी फंडसाठी देण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: लोकल ट्रेनमधील मृत्यू रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय, प्रवाशांना मोठा दिलासा

Crime: धक्कादायक! आपच्या बड्या नेत्यावर बेछूट गोळीबार; माजी डीएसपींनी घडवलं कृत्य, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राज्य सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडूंची भेट घेणार

Badamrao Pandit : भाजप प्रवेश होताच माजी आमदार आक्रमक! विजयसिंह पंडित हे अचानक अन् पैशाने झालेले आमदार

Women's World Cup 2025: २० चौकार,४ षटकार... सेमीफायनलमध्ये द. आफ्रिकेच्या कर्णधाराचं वादळी शतक; विश्वविक्रमही केला नावावर

SCROLL FOR NEXT