Ravi Rana 
विदर्भ

'शाईफेक घटनेच समर्थन करत नाही, माझा याच्याशी संबंध नाही'

याप्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, शाईफेक घटनेंच मी समर्थन करत नाही

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणावरून अमरावती महानगर पालिका आयुक्तांच्या (Municipal Commissioner of Amravati) अंगावर शाई फेकण्याचा प्रकार काल घडला आहे. त्यामुळे अमरावतीतील हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, येथील राजापेठ उड्डाणपुलावर बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रशासनाने हटवल्यानं शिवप्रेमी नाराज झाले होते. त्याच प्रकरणातून काल महानगर पालिका आयुक्तांवर शाईफेक करण्यात आली. या प्रकरणात आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यासह १० जणांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र याप्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, शाईफेक घटनेंच मी समर्थन करत नाही असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं आहे.

यावेळी पत्रकार परिषदेत ते म्हणाले, आतापर्यंत शाईफेकीच्या अनेक घटना झाल्या आहेत, मात्र कलम 307 नुसार गुन्हा दाखल झालेसा नाही. राज्यातील ठाकरे सरकार विरोधात बोलणाऱ्यांना कारागृहात टाकण्याचा कार्यक्रम सुरू असल्याची टोला त्यांनी यावेळी लगावला. नितेश राणेंप्रमाणे मलाही या प्रकरणात अडकवणयाचा प्रयत्न सुरू असून सरकार विरोधात बोललो म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. आयुक्तांवर जी शाईफेक झाली त्या घटनेचं मी समर्थन करत नाही, त्या घटनेशी माझा काहीही संबंध नाही. सुडबुद्धीने माझे नाव या प्रकरणात टाकण्यात आले असल्याचा आरोप आमदार राणा यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढल्यामुळे संतापलेल्या शिवप्रेमींनी शाईफेक केली, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी आपण दिल्लीला होतो असं रवी राणा म्हणाले आहेत. तसंच मला जाणीवपुर्वक अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचं म्हणत त्यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर आरोप केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : काळजी घ्या, सगळं ठरल्याप्रमाणं होईल! जरांगेंना भेटताच विखे पाटलांनी दिली सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती

Marathwada Rain Forecast : मराठवाड्यात आजपासून वादळासह पावसाची शक्यता, तापमानात एक ते दोन अंशाने वाढ

Numerology: 'या' मूलांकाच्या मुली सासरी घेऊन येतात अखंड समृद्धी! पाहा कोणत्या मूलांकाची मुलगी सासरसाठी ठरते लक्ष्मी?

Marathi News Live Updates : मरीन ड्राइव्हकडून हाजी अलीच्या दिशेने जाताना BMW कोस्टल रोडवरून कोसळली; तिघांचा मृत्यू, पोलिस काय म्हणाले?

Raju Shetti Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'ची नेहमीची भूमिका बदलली! राजू शेट्टी पहिल्यांदाच समतोल भूमिका घेत कारखानदारांच्या भेटीला; नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT