विदर्भ

...तर तीन महिन्यांत ओबीसींना आरक्षण देऊ: माजीमंत्री संजय कुटे

राजकुमार भीतकर : सकाळ वृत्तसेवा

आमदार कुटे म्हणाले की, सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण गेले, ओबीसींचे आरक्षण रद्द झाले.

यवतमाळ : महाआघाडी सरकारमधील ओबीसी (OBC) नेत्यांकडून ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्‍न सुटत नसेल तर राज्य सरकारने भाजपच्या चार ओबीसी नेत्यांना जबाबदारी द्यावी, तीन महिन्यांत ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करून देऊ, असे मत माजीमंत्री व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार संजय कुटे (MLA sanjay kute) यांनी व्यक्त केले. ते येथील विश्रामगृहात बुधवारी (ता. 23) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. (MLA sanjay kute said we will give reservation to OBCs in three months)

भारतीय जनता पक्षातर्फे 26 जून रोजी राज्यभर ओबीसींच्या आरक्षणासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची माहिती देण्यासाठी माजीमंत्री, तथा विद्यमान आमदार संजय कुटे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, माजी आदिवासी विकासमंत्री तथा राळेगाव विधानसभेचे आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उमरखेडचे आमदार नामदेव ससाणे, आमदार अ‍ॅड. नीलय नाईक, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार कुटे म्हणाले की, सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण गेले, ओबीसींचे आरक्षण रद्द झाले. तर मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा तिढाही कायम आहे. महाराष्ट्रातील आघाडी सरकार म्हणजे नाटक कंपनी आहे. त्यातील पहिले पात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असून त्यांनी ओबीसी आरक्षणावर शब्दही काढला नाही. दुसर्‍या पात्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसींचे नेते छगन भुजबळ आहेत. ते आंदोलनाचे केवळ नाटक करीत आहे. तर तिसर्‍या पात्रात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व मंत्री विजय वडेट्टीवार आहेत. या नेत्यांनी फक्त स्वार्स्थ साधला असून त्यांना खुर्चीचा मोह असल्याची टीका आमदार कुटे यांनी याप्रसंगी केली.

ते पुढे म्हणाले की, हे तिन्ही पक्ष सत्तेत असल्याने त्यांची भूमिका न्याय देण्याची असायला हवी. परंतु, त्यांनाच ओबीसींना आरक्षण देण्यात रस नाही. इम्पेरिकल डाटा व मागासवर्गीय आयोग स्थापन न केल्याने ओबीसींचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या जनजगनेची माहिती मागितली नाही. इम्पेरिकल डाटा व मागासवर्गीय आयोग स्थापन करून सदर माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर केल्यास ओबीसींचे आरक्षण पूर्ववत लागू होऊ शकते, असे मतही आमदार कुटे यांनी व्यक्त केले. ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील समदूरकर यांनी आभार मानले. राजू पडगीलवार व सूरज गुप्ता याप्रसंगी उपस्थित होते. (MLA sanjay kute said we will give reservation to OBCs in three months)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT