bhadrawat 
विदर्भ

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या जिल्ह्याच्या प्रशासनाने उचलले हे पाऊल

सकाळ वृत्तसेवा

भद्रावती (जि.चंद्रपुर): भद्रावती शहरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी पुर्वनियोजन व खबरदारी म्हणून हालचाली तीव्र करण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून आज (दि.10) जिल्हाभरात रंगीत तालीम घेण्यात आल्या. भद्रावती शहरात सकाळपासूनच स्थानिक डॉ. आंबेडकर चौक ते ग्रामोदय संघपर्यंतचा आंबेडकर वार्ड, भंगाराम वॉर्ड परीसर दुपारी 3 वाजेपर्यंत सिल करण्यात आला. सोबतच माजरी पोलिस स्टेशनअंतर्गत असलेला कुचना गाव परीसर देखील सिल केला होता. प्रशासनाने कोरोना विरुद्धच्या लढ्याची यशस्वी रंगीत तालीम या दोन्ही परीसरात घेतली.
तहसील विभाग, पोलिस विभाग, ग्रामीण रुग्णालय, नगरपालिका विभाग, आशा वर्कर व ईको-प्रो संस्था आदी या परीसरात तळ ठोकून होते. या परीसरातील घरोघरी जाऊन विचारपूस करण्यात आली. खोकला, सर्दी, शिंका, ताप, श्‍वास घेण्यास त्रास आदी लक्षण येथील रहिवाशांमध्ये दिसून येत आहेत काय, किंवा बाहेर गावाहून येथे कुणी आले आहे काय, आदी विचारपूस व तपासणी करण्यात आली. राज्यात ज्या घटना घडल्या त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून व पुढील संभाव्य लढाईची रंगीत तालीम म्हणून हे पाऊल प्रशासनाने उचलले होते.

सविस्तर वाचा - या शहरातील पोलिस झाले आक्रमक, नऊ जणांवर दाखल केले गुन्हे, हे आहे कारण
मॉक ड्रील यशस्वी
संपुर्ण जिल्ह्यामध्येच ही मॉक ड्रील करण्यात आली. त्याच धरतीवर भद्रावती येथील आंबेडकर वॉर्ड व तालुक्‍यातील कुचना येथे सदर मॉक ड्रील घेण्यात आली. एखादा पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यास कशा प्रकारे कार्यवाही करायची आहे. एरीया सिल करणे, परीसर निर्जंतूक करणे, प्रत्येक कुटुंबांचे आशा वर्कर तथा आरोग्य कर्मचा-यांद्वारे सर्वेक्षण करणे, काही लक्षण आढळल्यास क्वारंटाईन करणे, या प्रकारची ही प्रक्रीया होती. अगदी गोपनीय पद्धतीने सदर मॉक ड्रील कार्यवाही करण्यात आली. वेळेपर्यंत कुणालाच काहीच माहिती नव्हते. निवडक अधिका-यांनाच याची माहिती होती. यशस्विरीत्या सदर मॉक ड्रील पार पडली. जेवढे दिवस लॉक डाऊन आहे, तेवढे दिवस कुणीही घराबाहेर पडू नये. हा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
महेश शितोडे
तहसीलदार, भद्रावती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Criticism : 'कॉमेडियनना भेटायला वेळ, पण जरांगेंशी बोलायला नाही ’; अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

Dahi Handi Govinda Death : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून परतताना शिरोळमधील २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शेवटचा फोटो बाळूमामांसोबतचा

Onion Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सव्वा दोन कोटी कांद्याचे पैसे अडकले; शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन

मालिकेत सुखाचा संसार पण खऱ्या आयुष्यात सिंगल; दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या तेजश्रीचं वय काय?

Ujani Canal: कालवा तुडुंब, पण वीज गायब; महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पेनूर परिसरातील शेतकरी संतप्त, पिके जळू लागली

SCROLL FOR NEXT