mohan bhagwat express his feelings about m g vaidya in nagpur 
विदर्भ

VIDEO : मोहन भागवत यांनी मा. गो. वैद्य यांच्या पार्थिवाचे घेतले अंत्यदर्शन, म्हणाले 'बाबुरावां'चे जीवन म्हणजे संघाचा शब्दकोष

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : संघाचे विचार काय आहेत. मूळ काय आहे, हे सर्व आम्ही मा. गो. वैद्य यांच्याकडून शिकलो आहे. त्यांचे जीवन म्हणजे संघाचा शब्दकोष आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने घरातील एक बुजुर्ग व्यक्ती गेला. संघ परिवाराने एक बुजुर्ग व्यक्तीमत्व गमावला असल्याची भावना सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली. आज त्यांनी मा. गो. वैद्य यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. 

प्रांत स्थरावरून देशभरातील स्वसंसेवकांसोबत मा. गों. वैद्य यांचे घनिष्ठ संबंध होते. संघाच्या बाबतीत कुठलीही गोष्ट विचारायची असल्यास मा. गो. वैद्य हे हक्काचे स्थान होते.  त्यांचे जीवन कृतार्थ आहे. जीवन कसे जगायचे हेच त्यांनी आम्हा सर्वांना शिकविले, असेही ते म्हणाले.

आऱएसएसचे ज्येष्ठ स्वयंसेवक मा. गो. वैद्य यांचे शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यामुळे संपूर्ण संघ परिवारावर शोककळा पसरली आहे. माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य हे विचारवंत पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, तरुण भारतचे माजी मुख्य संपादक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक आणि प्रचार प्रमुख होते. संघाचे सह सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांचे ते वडील होते. तसेच १९७८ साली ते विधानपरिषदेचे सदस्यही होते. 

दरम्यान, थोड्याच वेळात मा. गो. वैद्य यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivraj Singh Chouhan News : शेतकऱ्यांसाठी Good News!, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले..

Video: वाल्मिक कराड पुन्हा करु शकतो जामिनासाठी अर्ज; जाणून घ्या काय आहे तरतूद?

Latest Marathi News Live Update : पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवणार - प्रफुल पटेल

IND vs ZIM, T20 WC: आफ्रिकेच्या विजयाने टीम इंडियाचा भार हलका केला! झिम्बाब्वेविरुद्ध संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून उतरला

Baramati News : बारामती नगरपरिषदेच्या पहिल्याच बैठकीत नगरसेवक आक्रमक...

SCROLL FOR NEXT