Borewell Dry Sakal
विदर्भ

Mokhada News : बोअरवेल आटल्या, विहीर कोरड्या ठाकं; टंचाई ग्रस्त गावपाड्यांची संख्या 50 शी पारं

प्रतिवर्षी पेक्षा यावर्षी ऊन्हाची तिव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे पाणी टंचाई ग्रस्त मोखाडा तालुक्यात टंचाई ग्रस्त गाव पाड्यांची संख्या वाढु लागली आहे.

भगवान खैरनार

मोखाडा - प्रतिवर्षी पेक्षा यावर्षी ऊन्हाची तिव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे पाणी टंचाई ग्रस्त मोखाडा तालुक्यात टंचाई ग्रस्त गाव पाड्यांची संख्या वाढु लागली आहे. ऊन्हाच्या तडाख्याने तालुक्यातील बोअरवेल आटल्या आहेत. विहीरी कोरड्या पडल्या आहेत. पाण्याचा श्रोत नसल्याने नळपाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे टंचाईग्रस्त गाव पाड्यांची संख्या पन्नाशी पार करून 54  वर पोहोचली आहे. त्यांना शासनाकडून टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो आहे. त्यामुळे नागरीकांना दिलासा मिळाला आहे.

पालघर जिल्ह्यात पाणी टंचाई बाबत मोखाडा तालुका अतिसंवेदनशील आहे. येथे प्रतिवर्षी जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्यात पाणी टंचाईला सुरूवात होते. मात्र, यावर्षी पर्जन्यवृष्टी कमी झाल्याने डिसेंबर 2023 मध्येच पाणी टंचाईला सुरूवात झाली आहे. यावर्षी ऊन्हाची तिव्रता अधिक आहे. त्यामुळे टंचाई ग्रस्त गाव पाड्यांची संख्या वाढत आहे. गतसालच्या तुलनेने यावर्षी ही तिव्रता अधिक वाढली आहे. 

मार्च महिना सरताच टंचाई ग्रस्त गाव पाड्यांची संख्या पन्नाशी पार झाली आहे. गोळीचापाडा, धामोडी, स्वामीनगर, कुडवा, कुंडाचापाडा, तेलीऊंबरपाडा, वारलीवाडी, हट्टीपाडा, हेदवाडी, गवरचरीपाडा, ठवळपाडा, राजेवाडी, जांभुळवाडी, हुंड्याचीवाडी, धामणी, तुंगारवाडी, मडक्याचीमेट, कोलद्याचापाडा, चारणगांव, वाकीचापाडा, ठाकुरवाडी, गोमघर, वाशिंद, वाघवाडी आणि शेलमपाडा या गावपाड्यांसह ही संख्या 54  वर पोहोचली आहे.

टंचाई ग्रस्त गाव पाड्यांना शासनाकडून 17 टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो आहे. येथील नागरीकांची तहान भागवण्यासाठी 12 हजार लिटर क्षमतेच्या टॅंकरच्या दररोज 66 फेऱ्या केल्या जात आहेत. त्यामुळे 20 हजार 612 नागरीकांची तसेच 6 हजार 695 जनावरांची अशी एकुण 27 हजार 307 जणांची तहान भागवली जात असल्याचे सरकारी अहवालावरून समोर आले आहे. 

दरम्यान, ऊन्हाची तिव्रता वाढू लागल्याने टंचाई ग्रस्त गाव पाड्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. तालुक्यातील केवनाळे, किनिस्ते, सावरपाडा, शेंड्याचीमेट, ऊधळे- हट्टीपाडा, नावळेपाडा, घानवळ, पाटीलपाडा, चोंढीपाडा आणि पिंपळपाडा या गावपाड्यांतील विहीरींनी तळ गाठला आहे, बोअरवेल आटल्या आहेत.

नळपाणीपुरवठा करण्याचा श्रोत आटला आहे. त्यामुळे त्यांनी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. येथे टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव, मोखाडा पंचायत समिती ने ऊपविभागीय अधिकारी आकार्यालयात मंजुरी साठी पाठविला आहे. 

टंचाई ग्रस्त भागात टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी तालुक्यातील पळसपाडा येथील वाघ प्रकल्पाचा पाझर तलाव आणि नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा धरण अधिग्रहण करण्यात आले आहे. येथुन जलशुध्दीकरण करून टंचाई ग्रस्त गाव पाड्यांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो आहे. त्यामुळे नागरीकांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजित पवार बोलतात, माझं काम बोलतं, १५ तारखेनंतर ते बोलणार नाहीत : मुख्यमंत्री फडणवीस

Somnath Temple: सोमनाथ मंदिरावर 1000 वर्षांनंतर असा प्रकाश आणि भव्यता पाहिली नाहीत, पाहा पीएम मोदींचा मंत्रजप व्हिडिओ

Pune Municipal Election : प्रचारातील भोंग्यांमुळे कानाला दडे! नागरिकांसह ज्येष्ठांना त्रास; विद्यार्थीही वैतागले

Pandharpur Accident: पंढरपुरातील पुलावरील भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू; आठजण गंभीर, वाहने २५ फूट खोली नदीत, नेमकं काय घडलं..

Pune Municipal Election : : आवाज वाढला; रविवार गाजला! पदयात्रा, फेरी, घरभेटींवर उमेदवारांचा भर

SCROLL FOR NEXT