monsoon heavy rain vidarbha five dead 26 injured lightning strike in bhandara gondia  sakal
विदर्भ

Lightning Strike : भंडारा, गोंदिया जिल्ह्यात वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू ; २६ महिला मजूर जखमी

भंडारा व गोंदिया जिल्ह्यात शुक्रवारी पाच वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Bhandara / Gondia News : भंडारा व गोंदिया जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २१ जुलै) पाच वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला तर, सोबत असलेल्या २६ महिला मजूर जखमी झाल्या. भंडारा जिल्ह्यात निलज खुर्द शिवारातील सूर्यप्रकाश बोंद्रे यांच्या शेतात रोवणीसाठी नवेझरी (ता. तिरोडा) येथील महिला आल्या होत्या.

दुपारी त्या जेवण करत असताना अचानक विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली व काही कळायच्या आत तेथे वीज कोसळली. त्यात लताबाई वाढवे (वय ५०) व बच्छला बावनथडे (५०) यांचा जागीच मृत्यू झाला,

तर अन्य सुलोचना शिंगणजुडे (५५), बेबीबाई सय्याम (५५) व निर्मला खोब्रागडे या तिघी जखमी झाल्यात. जखमींना गावकऱ्यांनी बैलबंडीने करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात केले.

दुसऱ्या एका घटनेत बोद्री येथील शेतात रोवणी करताना वीज कोसळून हिवराज भिमटे (३८) हा कान्द्री येथील तरुण जागीच ठार झाला. भंडारा जिल्ह्यातच चिचाळ (ता. पवनी) गावाजवळील चिचबोडी शिवारात रोवणीचे काम सुरू असताना दुपारी वीज कोसळली.

यात २३ महिला मजूर जखमी झाल्या. त्यापैकी ज्योती काटेखाये (३०) या महिलेची स्थिती गंभीर असून तिला उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे. किरकोळ जखमी २२ महिलांवर अड्याळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सडक अर्जुनी तालुक्यात शुक्रवारी (ता. २१) सकाळपासूनच पाऊस होता. दुपारी अडीचच्या सुमारास घाटबोरी/तेली येथील ओमदास वाघाडे (५५) हे शेतात काम करीत असताना अंगावर वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला.

शेतात काम करणाऱ्या मजुरांनी डुग्गीपार पोलिसांना माहिती दिली. देवरी तालुक्यातील शिलापूर ग्रामपंचायतीअंतर्गत येत असलेल्या भोयरटोला येथील ललिता राऊत (३४) हिचाही दुपारी शेतात रोवणी करत असताना वीज पडून मृत्यू झाला,

तर गणेशराम राऊत (६२) आणि अनुसया राऊत (५५) हे दोघे जखमी झाले. तसेच आमगाव तालुक्यातील बासीपार येथे दुपारी वीज पडून नरेश सुखदेव धुर्वे (रा. बासीपार) यांच्या मालकीच्या बैलाचा मृत्यू झाला.

देवरी तालुक्यात महिलेचा मृत्यू

गोंदिया - घाटबोरी तेली (ता. सडक अर्जुनी) येथे एका व्यक्तीचा तसेच देवरी तालुक्यातील शिलापूर येथे एका महिलेचा वीज पडून मृत्यू झाला. या घटना शुक्रवारी (ता. २१) दुपारनंतर घडल्या. आमगाव तालुक्यातील बासीपार येथे एका बैलाचादेखील वीज पडून मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT