चिकना : धरमखिंडी परिसरातील रस्त्यावरून जाणारा वाघ.  
विदर्भ

सकाळ-संध्याकाळी रस्त्यावरून वाघाचे "वॉक'

सकाळ वृत्तसेवा

कुही (जि.नागपूर) ः जिल्हयात कुठे ना कुठे वाघ दिसत असल्याच्या घटनांचे सत्र सुरूच असून यात वाघाने शिवारातील गुरांढोरांच्या नरडीचे घोट घेण्याच्या घटनांमुळे शेतक-यांचे आता शेतात जाणेही मुश्‍किल केले आहे. तालुक्‍यातील उमरेड-कऱ्हांडलाच्या गोठणगाव प्रवेशद्वाराच्या परिसरातील रेगातूर-दहेगाव रस्त्यावर सकाळी, तर चिकनानजीकच्या धरमखिंडी रस्त्यावर सायंकाळी वाघ दिसल्याने गावकऱ्यांची मोठी फजिती होत आहे. नागरिकांची कामे रेंगाळली आहेत. एका गावावरून दुसऱ्या गावाला जाण्यास नागरिक टाळाटाळ करीत आहेत.


मुलांनी काढला पळ
कुही तालुक्‍यातील अभयारण्यालगतच्या गावांत वाघ नेहमीच दिसत आहे. यासोबत पाठलाग करणे, माणसांवर व जनावरांवर हल्ला करणे व त्यांची शिकार करणे हे प्रकार यापूर्वीही अनेकदा घडले आहेत. यापूर्वी दहेगाव येथील एका महिलेवर व एका वृद्धावर हल्ला करून वाघाने त्यांचा जीव घेतला आहे. सोमवारी रेगातूर-दहेगाव रस्त्यावरच्या बारतीनचा पाट परिसरात सकाळी मुले व्यायामाला गेली असता त्यांना वाघ दिसला. घाबरून मुलांनी पळ काढला. तीन दिवसांपासून मुले पुन्हा व्यायामासाठी गेली नसल्याचे दहेगावचे सरपंच जितू गोंडाने यांनी सांगितले.

क्‍लिक करा - उद्‌धव सरकार, प्रकल्पांचा प्रश्‍न काही सुटेचिना !

अर्धा तास पाठलाग केला
मंगळवारी सायंकाळी चिकना येथील मंगेश शेंडे यांचा वाघाने सुमारे अर्धा किमीपर्यंत पाठलाग केला. या मार्गाने जाण्यास भीती वाटत असून, रात्रीच्या ड्यूटीसाठीही दिवसाच घरून निघत असल्याचे मंगेश यांनी सांगितले. बुधवारी सायंकाळी पुन्हा धरमखिंडीवर वाघाने रस्त्यावरच ठाण मांडले होते. चिकनाकडे जाताना येथील शैलेश जुमडे, बबलू जुमडे व शेतमजूर महिलांना वाघ दिसल्याने त्यांची बोबडी वळली होती. बस, दुचाकीस्वार, चारचाकी व वाहनांसह सुमारे दोनशे लोक या रस्त्यावर गोळा झाले होते. मात्र, वाघ रस्ता सोडत नसल्याने बराच वेळ त्यांना थांबून राहावे लागले. बऱ्याच वेळेनंतर वाघ धरमखिंडी जंगलात गेल्यावर सर्वांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. या घटनेनंतर या परिसरातील शेतात कामासाठी मजूर नकार देत आहेत. शेतकरीदेखील शेतात जाण्यास घाबरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT