crime sakal
विदर्भ

कुऱ्हाडीने हल्ला करून सासूचा खून

पत्नी गंभीर; जावई पसार, टाकरखेडापूर्णा येथील घटना

सकाळ वृत्तसेवा

आसेगावपूर्णा : चांदूर बाजार तालुक्यातील टाकरखेडा पूर्णा येथे जावयाने सासरवाडीत येऊन घरात सासू व पत्नीशी क्षुल्लक कारणांवरून वाद घालून कुऱ्हाडीने हल्ला सासूची हत्या केली तर या हल्ल्यात पत्नी गंभीररीत्या जखमी झाल्याची खळबळजनक घटना घडली.

पद्मा उर्फ रुक्माबाई विनायकराव इंगळे (वय ४५) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. टाकरखेडा पूर्णा येथे शुक्रवारी (ता. २८) ही घटना घडली. संशयित दिनेश भानुदास बोरखडे ( वय ३० रा. दर्यापूर जवळ पेठ ईदबारपूर ) असे हल्लेखोराचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आईची प्रकृती बरी नसल्याने मुलगी आठ दिवसांपूर्वीच माहेरी आली होती. शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास जावई टाकरखेडा पूर्णा येथे सासरवाडीत आला. दिनेशने पत्नीशी वाद घालायला सुरुवात केली. जावई व पत्नीमध्ये सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी आलेल्या सासूवर त्याने अचानक कुऱ्हाडीने वार करून खून केला. पद्मा उर्फ रुक्माबाई विनायकराव इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नी स्नेहल दिनेश बोरखडे ( वय २५) हिच्या डोक्यावरही कुऱ्हाडीने वार करून जखमी करण्यात आले. हल्ल्यानंतर जखमींनी आरडाओरडा केल्याने संशयित दिनेश बोरखडेने येथून पळ काढला.

दिनेशची जखमी पत्नी स्नेहल दिनेश बोरखडे हिने आसेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी पसार संशयित दिनेश बोरखडेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली होती. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सूर्यकांत जगदाळेंसह ठाणेदार किशोर तावडे यांनी भेट दिली.

मृतदेहासह नातेवाइकांचा ठाण्यात ठिय्या

खूनाच्या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेहासह आसेगावपूर्णा ठाण्यात धाव घेतली. सासू व पत्नीवर हल्ला करून फरार झालेल्या संशयितास जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह न हलविण्यावर नातेवाईक ठाम होते. त्यामुळे पोलिसांपुढे पेच निर्माण झाला होता. ठाणेदार किशोर तावडे यांनी पसार दिनेशला अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रोष शांत झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting: राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! गव्हावरील किमान आधारभूत किंमत वाढवली; आता दर किती मिळणार?

गौतमी पाटील आणि शिव ठाकरेचा लग्न करतानाचा Viral Video, चाहत्यांना बसला धक्का

Jalgaon Biogas : बायोगॅस ठरतोय वरदान; वर्षाकाठी वाचतोय हजारो रुपयांचा इंधन खर्च अन् मिळतेय कसदार सेंद्रिय खत

Dhaman Snake Mating in Satara : आनेवाडीत भररस्त्यात सापांचा रोमान्स; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ, दुर्मिळ दृश्य पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी

Ashok Kharat : 'कॅप्टन' खरातचे सिन्नरमध्ये मालमत्तांचे जाळे; पत्नीच्या नावावर कोट्यवधींचे भूखंड, तपासात नवी माहिती समोर

SCROLL FOR NEXT